Tokyo Olympics 2021: मीराबाई चानूच्या प्रशिक्षकांचाही होणार गौरव, भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून बक्षिसाची घोषणा

| Updated on: Jul 24, 2021 | 6:46 PM

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता तिच्या प्रक्षिकांनाही रोख रकमेचे बक्षिस भारतीय ऑलिम्पिक संघाने जाहीर केले आहे.

Tokyo Olympics 2021: मीराबाई चानूच्या प्रशिक्षकांचाही होणार गौरव, भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून बक्षिसाची घोषणा
भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा (चश्मा घातलेले) यांना IOA सन्मानित करणार आहे.
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला पदक मिळवून देण्यासाठी सर्वच भारतीय खेळाडू जीवाचं रान करत आहेत. या सर्वांना पदक जिंकून इतिहासात स्वत:च नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याची संधी आहे. या संधीची ‘चांदी’ भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) केली असून तिने 49 किलोग्राम गटात रौप्य पदक पटकावलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचं कौतुक होत असून तिच्यासह भारतीय वेटलिफ्टींग संघाचे मुख्य प्रशिक्षक विकास शर्मा (Vikas Sharma) यांचाही सन्मान केला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) शर्मा यांना रोख रकमेचे बक्षिसही जाहीर केले आहे.

मीराबाई चानू भारतात परतताच तिच्यावर कौतुकासह बक्षिसांचा पाऊस पडणार हे नक्की. मणिपुर सरकारने एक कोटी आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने  40 लाख मीराबाईला बक्षिस म्हणून जाहीर केले आहेत. त्यासोबत तिचे प्रशिक्षक विकास शर्मा यांनाही बक्षिस मिळणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 12.50 लाख रुपये, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकांला 10 लाख रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकांला 7.50 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

प्रशिक्षकांचाही होणार सन्मान

ANI ने दिलेल्या माहितीनुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाचाही गौरव करण्यात येणार आहे. मेहता म्हणाले, “प्रशिक्षक ज्यांनी खेळाडूंना  ट्रेनिंग दिली.  त्यांच्यासोबत थांबून सराव करवून घेतला. त्यांनाही रोख रकमेचे बक्षिस दिले जाणार आहे. यानुसारच मीराबाईचे कोच विजय शर्मा यांना 10 लाख रुपये देण्यात येतील.”

नॅशनल फेडरशनलाही मिळणार बक्षिस

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 75 लाख रुपये, रौप्य जिंकणाऱ्याला 40 लाख आणि कांस्य पदक जिंकणाऱ्याला 25 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येतील. तसेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 1-1 लाख रुपयेही देण्यात येणार आहेत. तसेच पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या नॅशनल फेडरेशनलाही 30 लाख रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांनीच टाळ्यांचा कडकडाट, मीराबाई मेडल जिंकताना घरी काय घडलं, पाहा VIDEO

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

(Tokyo Olympics Silver medal Winner Mirabais Coach Will also Get cash Prize from Indian Olympic Association)