Vaibhav Sooryavanshi: टीम इंडिया पोहोचली न्यूझीलंडला, पण Airport वर फक्त वैभव सूर्यवंशीने वेधलं लक्ष, Video Viral

Vaibhav Sooryavanshi Video: वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. न्यूझीलंडला पोहोचताच त्याच्यासोबत काय घडलं ते पाहा...

Vaibhav Sooryavanshi: टीम इंडिया पोहोचली न्यूझीलंडला, पण Airport वर फक्त वैभव सूर्यवंशीने वेधलं लक्ष,  Video Viral
| Updated on: Oct 19, 2026 | 12:17 PM

IND vs NZ Series: न्यूझीलंडला कडवी झुंज देण्यासाठी भारतीय संघ क्राइस्टचर्चमध्ये दाखल झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या टी-२० मालिकेनंतर, भारतीय खेळाडू थेट न्यूझीलंडला रवाना झाले आहेत. भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध आपली ताकद दाखवणार आहे. भारतासाठी न्यूझीलंडचा हा दौरा मोठा असणार आहे. भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका, पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी आता वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने भारतीय संघाचा विमानतळावर उतरतानाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सर्वांचे लक्ष वेधून घेतो. विमानतळावर उतरल्यावर वैभवच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्याचा खेळकर स्वभाव स्पष्टपणे दिसत होता, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.

Loading...

या दौऱ्यासाठी वैभवचा टी-२० संघातही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, विमानतळावर वैभवला पाहून एका महिला चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढला. त्याचे वय कमी असूनही, वैभव सूर्यवंशीची फॅन फॉलोविंग झपाट्याने वाढत आहे. या दीर्घ दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल. त्यानंतर ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाईल, जी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण आहे. अखेरीस, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप डोळ्यासमोर ठेवून १९ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाईल.

बीसीसीआयने या दौऱ्यासाठी एक मजबूत संघ निवडला आहे. श्रेयस अय्यर टी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करेल, तर शुभमन गिल एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली केवळ एकदिवसीय मालिकेत खेळतील, तर जसप्रीत बुमराह थेट कसोटी मालिकेत सामील होईल. टी-२० च्या संघात भुवनेश्वर कुमारची रिएन्ट्री करण्यात आली आहे. नुकतीच वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका रंगली पण भारतीय संघाला जिंकता आली नाही. पावसामुळे आता मालिका २-२ बरोबरीत सुटली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us