Vaibhav Sooryavanshi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते, सगळे शांतपणे ऐकत होते पण वैभवला मात्र हसू अनावर, Video Viral
Vaibhav Sooryavanshi Video Viral: वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना वैभव सूर्यवंशीने काय केले ते पाहा...

PM Modi To Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार फलंदाजीच्या शैलीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. अनेक दिग्गज लोकही त्याच्या फलंदाजीचे चाहते झाले आहे. अनेकांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे. आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीही वैभवचे फॅन झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी, पंतप्रधान मोदींनी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंचाही समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील काही पदक विजेते १५-१७ वर्षांचे आहेत. ते म्हणाले की, “या सर्व खेळाडूंनी देशाला अभिमान मिळवून दिला आहे.” त्यांनी हे बोलताच कॅमेरा वैभव सूर्यवंशीकडे वळला. पंतप्रधानांच्या कौतुकावर या १५ वर्षीय मुलाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक खेळाडू १५-१७ वर्षांचे होते. इतक्या लहान वयात या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला अभिमान मिळवून दिला आहे. त्यांनी देशवासियांची मने जिंकली आहेत.” हे ऐकून वैभव हसताना दिसला.
पंतप्रधान मोदी यांनी असेही म्हटले की, “यशासाठी वय हा अडथळा ठरू नये. लवकर सुरुवात करणे नंतर फायद्याचे ठरू शकते आणि म्हणूनच, अगदी लहान वयातच प्रतिभा ओळखली पाहिजे. ‘खेलो इंडिया’ आणि ‘इमर्जिंग स्पोर्ट्स इंडिया’ अंतर्गत येत्या काही वर्षांत हजारो खेळाडूंना संधी मिळेल.
सीडेड सिस्टीमनुसार भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि श्रेष्ठ रँकिंगच्या आधारावर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला १२४ धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. वैभव सूर्यवंशीने दोन डावांत ५३ धावा केल्या. केवळ पुरुष संघच नाही, तर भारतीय महिला क्रिकेट संघानेही सुवर्णपदक जिंकले. महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला १४७ धावांनी ऐतिहासिक पराभव दिला.