Vinod Kambli Wife: निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली, थेट त्याच्या…

Vinod Kambli Wife Andrea Hewitt Statement: विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, आता या व्हिडिओवर त्यांची पत्नीने त्यांची प्रतिक्रिया दिली असून ती प्रचंड संतापली आहे.

Vinod Kambli Wife: निर्लज्जपणाचा कळस! विनोद कांबळीच्या बिकट अवस्थेवर पत्नीने उडवली खिल्ली, थेट त्याच्या...
| Updated on: Sep 28, 2026 | 10:52 AM
Vinod Kambli Wife Andrea Hewitt Statement: टीम इंडियाचा माजी धुरंधर खेळाडू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहेत.  दोन दिवसांपूर्वी आजारपणाशी झुंज देत असलेल्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये कांबळी ठाण्यातील ‘निदान सेंटर फॉर एल्डर्ली केअर’ या वृद्धाश्रमात असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळी वृद्धाश्रमात काय करतोय? तर त्यांची पत्नी कुठे आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यानंतर आता विनोद कांबळीच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद कांबळीच्या पत्नीचा मोठा खुलासा
व्हायरल व्हिडिओमध्ये विनोद कांबळी अडखळत बोलताना दिसला. व्हिडिओमध्ये कांबळी असे म्हणाले की, “माझ्यावर सध्या उपचार सुरू असून येथील सोयी-सुविधा अत्यंत सोयीस्कर आहेत. येथे राहताना मला घरापासून दूर असल्याचे अजिबात वाटले नाही” यानंतर कांबळी हसले. आता कांबळी सध्या घरी आहेत, या व्हिडिओनंतर माजी अंपायर आणि कांबळी यांचे जुने मित्र मार्कस कुटो यांनी त्यांच्या वांद्रे येथी घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळी यांच्या पत्नींनी यामागचे सत्य सांगितले.
कुटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते आता स्वत: नाश्ता करत आहे, आणि आता ते आधीपेक्षा अधिक सक्षम दिसत आहेत. तसेच त्यांची स्मरणशक्तीही आधीसारखीच चांगली आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही कारण नाही. यावेळी त्यांनी विनोद कांबळी ओल्ड एज होममध्ये का गेला यामागचे कारणही सांगितले.
रुग्णालयातील असे व्हिडिओ आणि रील्स व्हायरल झाल्यामुळे कांबळी यांची पत्नी अँड्रिया हेविट आणि दोन्ही मुले नाराज झाले आहेत, असं कुटो यांनी सांगितले आहे. अँड्रिया यांची प्रकृतीही सध्या ठीक नसल्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी वेळोवेळी कांबळी यांची काळजी घेण्यासाठी आणि उपचारांसाठी मदत करत होते. कधीकधी अँड्रिया यांना कांबळी आणि त्यांच्या दोन मुलांची एकत्र देखभाल करणे कठीण जाते. अँड्रिया यांचीही प्रकृती काही विशेष बरी नाही. त्यामुळे त्या मदतीसाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना बोलावत असतात आणि त्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना घरून केंद्रावर नेतात  त्यांची काळजी घेतात आणि त्यांना पुन्हा घरी परत आणून सोडतात, असं कुटो यांनी सांगितलं. यामुळे विनोद कांबळी यांच्या आजरासंदर्भात त्यांच्या पत्नीला गंभीरता नसून तिने वर वर उत्तर दिल्याचे जाणवत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us