Virat Kohli: विद्यार्थ्यांसाठी अखेर विराट कोहलीची पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल, पण लोकांना वेगळीच शंका

दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांंचे आंदोलन सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. आता या आंदोलनावर अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच विराट कोहलीनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट व्हायरल होत आहे.

Virat Kohli: विद्यार्थ्यांसाठी अखेर विराट कोहलीची पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल, पण लोकांना वेगळीच शंका
| Updated on: Jul 24, 2026 | 11:04 AM

सध्या देशात दिल्लीत जंतरमंतरवर नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरण तेव्हा चिघळले जेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. आता यानंतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटींना पोस्ट शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. तर अनेक सेलिब्रिटी स्वत: या आंदोलनतान सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या लढाईत अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवल्याने अनेकांचे कौतुक झाले पण अनेकांनी यावर काहीच न बोल्याने तेही ट्रोल झाले. अशातच आता विराट कोहलीने एक पोस्ट शेअर केली आहे. कोहलीची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हारल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावाने एक स्क्रीनशॉट ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “विद्यार्थ्यांना एक निष्पक्ष प्रणाली आणि पारदर्शक परीक्षा मिळायला हव्यात आणि प्रशासनाने त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे.” हा स्क्रीनशॉट खरा वाटतो, कारण त्यात विराट कोहलीचे नाव, पत्नी अनुष्का शर्मासोबतचा त्याचा प्रोफाइल फोटो दिसत असून ते अकाऊंट व्हॅरिफाईड दिसत आहे, ज्यामुळे अनेक लोक ते खरा मानत आहेत.

व्हायरल पोस्टच्या सखोल तपासणीत समजलं की ही पोस्ट फेक आहे. व्हायरल स्क्रीनशॉटमधील अकाउंट हँडल/युझरनेम @Highonchurma आहे, तर विराट कोहलीचे खरे आणि अधिकृतपणे व्हेरिफाईड ‘X’ हँडल @imVkohli आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला हा स्क्रीनशॉट विराट कोहलीचा नाही. विराट कोहलीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी अशी कोणतीही पोस्ट किंवा विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे अजून तरी विराट कोहलीने यावर भाष्य केलेले नाही. विराटने या प्रकरणावर भाष्य न केल्याने तो खूपच ट्रोल होत आहे. विराट स्वत: दिल्लीचा असूनही त्याने या आंदोलनावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने लोक त्याच्या भडकले आहेत. विराट आणि अनुष्का नुकते प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Follow Us