#ViratKohli : विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले, ट्विटरवर काय म्हणाला विराट?, वाचा

| Updated on: Jan 15, 2022 | 7:31 PM

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. त्याने काही वेळापूर्वीच कर्णधारपद सोडत असल्याचे ट्विट केले आहे.

#ViratKohli : विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले, ट्विटरवर काय म्हणाला विराट?, वाचा
विराट कोहली
Follow us on

विराट कोहलीने (Virat kohli step down as captain) कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. त्याने काही वेळापूर्वीच कर्णधारपद सोडत असल्याचे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci)असे चित्र निर्माण झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असे सांगितले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने (Bcci) त्याच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचेही कर्णधारपद काढून घेतले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचेही दिसून आले. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.

विराट कोहलीचे ट्विट काय?

संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.

मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार. असे ट्विट त्याने केले आहे.

 

भारतीय क्रिकेट टीममध्ये दुफळी?

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा कर्णधार टी-20 आणि वनडेचा कर्णधार झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी विरोट कोहली काही सामने खळणार नसल्याचे उधाण आले, त्यानंतर तो खेळणार नाही अशी कोणतीही माहिती मी बीसीसीआयला दिली नाही, असे विरोट कोहलीने पत्रकार परिषद घेत सांगितले, त्यानंतर मोठा संभ्रम निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला, त्यानंतर विरोटला रोहितच्या नेतृत्वात खेळायचे नाही आणि रोहिला विराटच्या नेतृत्वात खेळायचे नाही, अशा चर्चांना उधाण आले. मात्र असे काही नसल्याचे विरोटकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे इंडियन क्रिकेट टीममध्ये चाललंय काय? हे कुणालाच कळेनाय.

Ajinkya Rahane: ठरलं! निवड समिती रहाणे, पुजाराला करणार Thank You, हे दोन फलंदाज घेणार जागा

U-19 World cup: ऑस्ट्रेलियाकडे असा बॉलर जो दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी, जाणून घ्या त्याचं भारतीय कनेक्शन

Mumbai Indians: ‘बुमराहला नडताना IPL चा नाही, आधी देशाचा विचार केला’, दक्षिण आफ्रिकेच्या पेस बॉलरचं कौतुक