Virat Kohli: आणि मी आतून पूर्णपणे तुटलो… असं काय घडलं की विराट कोहली मानसिकदृष्टया खचला? ऐकाल तर मन सुन्न होईल
Virat Kohli News: विराट कोहलीने आता भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळण्यापूर्वी एक विधान केले होते ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

IND vs WI Odi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. यांच्यात पहिला वनडे सामन्याला आज सुरुवात झाली आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आता या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक विधान केले आता त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी जिओस्टारशी बोलताना, विराट कोहलीने एक वेदनादायक खुलासा केला. त्याने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीतील पराभव हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षणांपैकी एक असल्याचे म्हटले. कोहली म्हणाला की, “हा पराभव स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते आणि अनेक महिने मी त्यातून मानसिकरित्या सावरू शकला नाही. २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीतील न्यूझीलंडकडून झालेला १८ धावांचा पराभव स्वीकारणे अत्यंत कठीण होते आणि त्याचा परिणाम माझ्यावर अनेक महिने टिकून राहिला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे भारताचे अव्वल फलंदाज लवकर बाद झाले. जर तो सामना त्या दिवशी पूर्ण झाला असता, तर निकाल वेगळा लागला असता. त्या पराभवाने मला आतून तोडले…” २०१९ विश्वचषक उपांत्य फेरीची आठवण काढताना विराट कोहलीने आपल्या वेदना व्यक्त केल्या.
तो म्हणाला की, “निकालामुळे त्याला खूप दुःख झाले होते आणि पुढील काही महिने तो मानसिकदृष्ट्या त्यातून पूर्णपणे सावरू शकला नाही. सामन्यात पावसामुळे आलेला व्यत्यय आणि दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नव्या चेंडूने परिस्थितीचा फायदा घेण्याची दाखवलेली क्षमता, हे भारतासाठी एक मोठे नुकसान ठरले. अंतिम सामन्यात तो ५४ धावांवर फलंदाजी करत होता आणि मला वाटले होते की मी एक मोठी खेळी खेळू शकतो. पण बाद झाल्यानंतर, अनेक दिवस तो पराभव स्वीकारणे त्याच्यासाठी कठीण होते. कोहलीने २०२३ च्या विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील वातावरण खूप सकारात्मक असल्याचे वर्णन केले. त्याने संघातील खेळाडूंमधील उत्कृष्ट समन्वय आणि एकमेकांसाठी खेळण्याच्या भावनेचे कौतुक केले.