मुंबईकर वसीम जाफर कैक पटीने सरस पण तरीही प्रज्ञान ओझाच चिफ सिलेक्टर कसं बनले? एकमेव कारण समोर

प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखाली, बीसीसीआयने माजी फिरकीपटू रमेश पोवार यांना पुरुष निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. आता असा प्रश्न आहे की माजी क्रिकेटपटू वसीम जाफर या पदासाठी जास्त दावेदार असताना प्रज्ञान ओझाकडे हे पद सोपवण्यात का आले आहे ते पाहा... चीफ सिलेक्टरच्या नियुक्तीमध्ये कसोटी सामन्यांचा अनुभव हा

मुंबईकर वसीम जाफर कैक पटीने सरस पण तरीही प्रज्ञान ओझाच चिफ सिलेक्टर कसं बनले? एकमेव कारण समोर
| Updated on: Oct 20, 2026 | 10:22 AM

Pragyan Ojha Cheif Selector: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीची सूत्रे आता माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या काही वर्षांत तीन आयसीसी ट्रॉफी आणि अनेक मोठी विजेतेपदे जिंकली. प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखाली, बीसीसीआयने माजी फिरकीपटू रमेश पोवार यांना पुरुष निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. रमेश पवार यांना प्रशिक्षणाचा अनुभव असून, त्यांनी महिला संघाला आशिया कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके मिळवून दिली आहेत. आता असा प्रश्न आहे की माजी क्रिकेटपटू वसीम जाफर या पदासाठी जास्त दावेदार असताना प्रज्ञान ओझाकडे हे पद सोपवण्यात का आले आहे ते पाहा…

चीफ सिलेक्टरच्या नियुक्तीमध्ये कसोटी सामन्यांचा अनुभव हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. विद्यमान निवड प्रक्रियेनुसार, ज्या झोनच्या सदस्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, तोच निवड समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी दावेदार आहे. वसीम जाफरने एकूण 31 कसोटी सामने खेळले आहेत. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाने 24 कसोटी सामने खेळले आहेत तरीही त्यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे. पण आता फक्त कसोटी सामन्यांचा आकडा हा नियुक्तीसाठी निश्चित मानला जात नाही हे समजत आहे. अंतिम निर्णय हा क्रिकेट सल्लागार समिती आणि बीसीसीआयच्या प्रक्रियेअंतर्गत पार पडतो.

Loading...

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे हे आहेत. वसीम जाफर यांनी अर्ज केला असला तरी प्रज्ञान ओझा यांना बीसीसीआय अंतर्गत कमिटीमध्ये समर्थन असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रज्ञान ओझा यांना निवड समितीचं अध्यक्ष बनवावं असं बीसीसीआयमध्ये अनेकांच ठोस मत होत म्हणूनच तसा निर्णय घेण्यात आला आहे.

आगरकरांचा कार्यकाळ चा फार चर्चेचा विषय बनला होता. आगकरांच्या कार्यकाळात भारतीय संघात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूंना निवृत्ती घ्यावी लागली होती यामुळे आगरकरांना फार ट्रॉलिंगचा सामना करावा लागला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us