Virat Kohli : वसीम जाफरचा धक्कातंत्र, विराट कोहली नंतर नंबर 3 च्या पोजिशनसाठी निवडलं फक्त 5 वनडे खेळलेल्या या खेळाडूला

Virat Kohli : विराट कोहली सध्या वनडे क्रिकेटमध्ये नंबर 3 वर खेळतोय. पण त्याच्यानंतर कोण? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारताचा अनुभवी फलंदाज वसीम जाफरने नंबरच्या तीनच्या जागेसाठी ऋतुराज गायकवाडचं नाव घेतलं नाही. त्याऐवजी फक्त गाठीशी पाच वनडेचा अनुभव असलेल्या खेळाडूला निवडलं.

Virat Kohli : वसीम जाफरचा धक्कातंत्र, विराट कोहली नंतर नंबर 3 च्या पोजिशनसाठी निवडलं फक्त 5 वनडे खेळलेल्या या खेळाडूला
Virat Kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2026 | 9:01 AM

टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहलीने आधीच स्पष्ट केलय की, पुढच्यावर्षी होणारा वनडे वर्ल्ड कप 2027 त्याच्या करिअरमधील शेवटचा वनडे वर्ल्ड कप असेल. भारतीय चाहत्यांच्या मनात या बद्दल संमिश्र भावना आहेत. काही चाहते खुश आहेत कारण पुढच्या वर्षीपर्यंत कोहलीच्या बॅटिंगचा आनंद घेता येईल. काही फॅन्स दु:खी आहेत, कारण 2027 वनडे वर्ल्ड कप नंतर विराट कोहली पुन्हा मैदानावर दिसणार नाही. कोहलीने टेस्ट आणि टी 20 क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. टी20 मध्ये आता अनेक आक्रमक प्लेयर्स आहेत. त्यामुळे कोहलीची कमतरता जाणवत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिलने विराट कोहलीची नंबर 4 ची पोजिशन खूप चांगल्या पद्धतीने संभाळली आहे. आता प्रश्न हा आहे की, वनडेमध्ये विराट कोहलीनंतर नंबर 3 वर कोण खेळणार?. विराट कोहलीने मागच्या 15 वर्षांपासून नंबर 3 ची पोजिशन खूप चांगल्या पद्धतीने संभाळली आहे. बीसीसीआयवर पर्याय शोधण्याची वेळ आणली नाही. पण आता कोहली नंतर ही जबाबदारी कोण संभाळणार? बीसीसीआयकडे असा कुठला प्लेयर आहे का?

वसीम जाफरने वनडेमध्ये नंबर 3 च्या पोजिशनसाठी कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल दोघांची निवड केलेली नाही. त्यांनी नंबर 3 च्या पोजिशनसाठी भारतीय टी 20 टीमचा उपकर्णधार तिलक वर्माची निवड केली आहे. कोहलीसह रोहित शर्माचा सुद्धा हा शेवटचा वनडे वर्ल्ड कप असेल. हिटमॅनची जागा यशस्वी जैस्वाल घेऊ शकतो. गायकवाडची जागा वनडे टीममध्ये अजून पक्की नाहीय.

Loading...

वसीम जाफरने नंबर 3 च्या पोजिशनसाठी कोणाचं नाव घेतलं?

“तिलकच्या खेळातील वर्सेटिलिटी पाहून खूप छान वाटतं. त्याने याआधी नंबर 3 वर सेंच्युरी बनवली आहे. आता त्याने नंबर 5 आणि 6 च्या पोजिशनसाठी स्वत:ला व्यवस्थित तयार केलं आहे. त्याच्याकडे कमालीची क्वालिटी आहे. आता वेळ आलीय, जेव्हा रोहित आणि विराट बाहेर पडतील, टॉप ऑर्डरमध्ये रोहितची जाग यशस्वी जैस्वाल घेईल. पण माझ्या मते विराटच्या जागी लेफ्ट हँडर बॅटर असेल. तिलककडे तो गेम आहे. दुलीप ट्रॉफी मध्ये त्याने कशा धावा केल्यात ते आम्ही पाहिलय. त्याचा फर्स्ट क्लास एवरेज जवळपास 55 आहे. म्हणून तिलक तिन्ही फॉर्मेटमध्ये फिट बसू शकतो” असं वसीम जाफर आपल्या YouTube चॅनलवर म्हणाला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us