Video: मॅच सुरु असतानाच दिल्लीकरांमध्ये तुफान राडा, अक्षर:श अंगावर धावून गेले, काही केल्या थांबेना अन् नंतर… Video Viral

आसाम प्रीमियर लीगमध्येही सामना संपताच खेळाडूंमध्ये राडा झाला होता. आता दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये रोमांचक सामन्यांची मालिका सुरू आहे. या काळात खेळाडूंमधील वादही चर्चेत आहेत.

Video: मॅच सुरु असतानाच दिल्लीकरांमध्ये तुफान राडा, अक्षर:श अंगावर धावून गेले, काही केल्या थांबेना अन् नंतर... Video Viral
| Updated on: Aug 10, 2026 | 8:25 AM

सध्या प्रत्येक शहराचे लीग सामने सुरु आहेत. या लीग सामन्यांची भलतीच चर्चा सुरु असते. या लीग सामन्यात अनेक खेळाडू ताबडतोब खेळतात तर काही खेळाडूंमध्ये वाद होताना दिसतात. आसाम प्रीमियर लीगमध्येही सामना संपताच खेळाडूंमध्ये राडा झाला होता. आता दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये रोमांचक सामन्यांची मालिका सुरू आहे. या काळात खेळाडूंमधील वादही चर्चेत आहेत. विशेषतः, आउटर दिल्ली वॉरियर्स आणि सेंट्रल दिल्ली किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान प्रियांश आर्या आणि यश धुल यांच्यात झालेला वाद चर्चेत आहे. सामन्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, यश धुल आणि प्रियांश आर्या यांना सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ वेगळे करत असल्याचे दिसत आहे. ही घटना हंगामातील 17 व्या सामन्यादरम्यान घडली, ज्यामध्ये आउटर दिल्लीने सेंट्रल दिल्लीचा 25 धावांनी पराभव केला. हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. प्रियांश आर्या आणि यश धुल हे दिल्लीच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंपैकी आहेत. यश धुलने कर्णधारपद भूषवत 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून ओळख मिळवली, तर प्रियांशला दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ओळख मिळाली. या लीगमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर, इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्सकडून केलेल्या स्फोटक फलंदाजीमुळेही तो चर्चेत आला. यश आणि प्रियांश दोघेही सलामीचे फलंदाज आहेत.

सामन्याच्या निकालानुसार, आउटर दिल्लीने सेंट्रल दिल्लीचा 25 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना, आउटर दिल्लीने आपल्या निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 216 धावा केल्या. आउटर दिल्लीकडून प्रियांशने 18 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या. यश शर्माने 25 चेंडूंमध्ये 46 धावा करून संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.

आउटर दिल्लीच्या या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, सेंट्रल दिल्लीचा संघ 17.2  षटकांत 191 धावांवर सर्वबाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना, सेंट्रल दिल्लीचा कर्णधार यश धुलने 23 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. सेंट्रल दिल्लीच्या फलंदाजीत जसवीर शहरवतने चमकदार कामगिरी केली. त्याने 33 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या, पण असे असूनही संघाला विजय मिळवता आला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us