पलाश मुच्छल याच्या व्हायरल स्क्रीनशॉर्टनंतर मोठी खळबळ, थेट या भारतीय क्रिकेटरच्या कथाकथित गर्लफ्रेंडची धमकी, थेट म्हणाली मी स्क्रीनशॉर्ट..

भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न पलाश मुच्छल याच्यासोबत होते. मात्र, वडिलांचे तब्येत अचानक खराब झाल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यानंतर थेट पलाश मुच्छल याचे धक्कादायक स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली.

पलाश मुच्छल याच्या व्हायरल स्क्रीनशॉर्टनंतर मोठी खळबळ, थेट या भारतीय क्रिकेटरच्या कथाकथित गर्लफ्रेंडची धमकी, थेट म्हणाली मी स्क्रीनशॉर्ट..
Smriti Mandhana and Palash Muchhal
| Updated on: Nov 27, 2025 | 12:12 PM

भारताची क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होते. मात्र, लग्नाच्या काही तास अगोदरच स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यासोबतच तिचा होणारा नवरा आणि बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या लग्नानंतर काही स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. पलाश मुच्छल स्मृती मानधनाला प्रेमात धोका देत असल्याचा दावा करण्यात येतोय. हेच नाही तर पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांच्यातील चॅटिंगचे फोटो व्हायरल झाले. पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला, असा दावा इंटरनेटवर केला जात आहे. मेरी डिकॉस्टा ही देखीलप पुढे आली असून तिने यावर भाष्य केले.

पलाश आपल्याला धोका देत असल्यानेच स्मृती मानधना हिने लग्न अचानक मोडल्याचे व्हायरल होणाऱ्या चॅटिंगनंतर सांगितले जातंय. लग्नाच्या ऐनवेळी स्मृती मानधना हिच्यासोबत पलाशचा खरा चेहरा पुढे आला. त्यानंतर वडिलांची तब्येत खराब झाल्याचे सांगत तिने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पलाश आणि स्मृती मानधना यांनी व्हायरल स्क्रीनशॉर्टवर बोलणे टाळले. हेच नाही तर स्मृती मानधना हिने लग्नातील समारंभाचे फोटोही डिलीट केले.

सध्याच्या घडामोडींनुसार, स्मृती मानधना आणि पलाश यांच्या नात्यात सर्वकाही अजिबातच व्यवस्थित नाहीये. त्यामध्येच या सर्व वादात भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल याची कथाकथित गर्लफ्रेंड आरजे महविश हिने भाष्य केले. एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आरदे महविशने म्हटले की, तिने संपूर्ण पुरुष समुदायाला अडचणीत आणले आहे. जर तिच्यावाला कोणत्याही मुलीला मेसेज करेल तर ती स्क्रीनशॉर्ट व्हायरल करेल.

तिने म्हटले की, पुरूष खूप सुंदर असतात. तुम्ही त्यांना विचाराल तेव्हा ते नेहमीच अविवाहित असतात. स्मृती मानधना प्रकरणात मला खरं काय आहे ते माहित नाही, पण माझ्या लग्नात, मी माझ्या नवऱ्याला एक आठवडा आधीच ऑनलाइन लाँच करेल. मुलींनो, कृपया मला येऊन सांगा आणि असा विचार करू नका की, आता लग्न होत आहे, मी या जगात कोणावरही विश्वास ठेवत नाही. आता, मी कोणालाही असे म्हणू शकत नाही की हा माणूस कोणासाठीही काहीही करू शकत नाही.