पूनम पांडेनंतर आता मार्क जुकरबर्ग यांच्या मृत्यूची बातमी येणार?; कुणी व्यक्त केली शंका?

| Updated on: Feb 03, 2024 | 6:48 PM

पूनम पांडे हिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. हेच नाही तर थेट पूनम पांडे हिचे निधन झाल्याचा दावा करण्यात आला. आता अजून एक हैराण करणारा रिपोर्ट पुढे येताना दिसत आहे.

पूनम पांडेनंतर आता मार्क जुकरबर्ग यांच्या मृत्यूची बातमी येणार?; कुणी व्यक्त केली शंका?
Follow us on

मुंबई : पूनम पांडे हिचे निधन झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हेच नाही तर तिच्याच सोशल मीडियावरून हे सांगण्यात आले की, गर्भाशयातील कॅन्सरमुळे तिचे निधन झाले. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लोक हे पूनम पांडे हिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर अनेकांनी थेट पूनम पांडे हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीच करून टाकली आहे. आता पूनम पांडे हिच्यानंतर अजून एका मोठ्या व्यक्तीच्या निधनाबाबत विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. यामुळे लोक हे हैराण होताना दिसत आहेत.

आता मेटाचे सीईओ अर्थात मार्क झुकरबर्ग यांच्या मृत्यूबाबत थेट भाष्य करण्यात आलंय. मार्क झुकरबर्ग यांना मोठा धोका असल्याचे देखील सांगितले जातंय. थेट अमेरिकेच्या सरकारी एजन्सीला सादर केलेल्या अहवालात टेक कंपनीने म्हटले आहे की, मार्क झुकरबर्गचा मृत्यू होऊ शकतो. आता यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.

युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे दाखल केलेल्या अहवालात मोठा खुलासा करण्यात आलाय. थेट मेटाला मार्क झुकरबर्गच्या काही वैयक्तिक सवयी आवडत नाहीत. मार्क झुकेरबर्ग यांच्या काही सवयी कंपनी आणि गुंतवणूकदारांसाठी मोठा धोका असल्याचे आता थेट मत मेटाकडून व्यक्त करण्यात आलंय.

फक्त हेच नाही तर या सवयींमुळे मार्क झुकरबर्गचा मृत्यू होऊ शकतो, असेही सांगण्यात आलंय. 10-K अहवालात असे म्हटले आहे की, आम्ही मार्क झुकरबर्गसह आमच्या कर्मचाऱ्यांच्या निरंतर सेवा आणि कामगिरीवर सर्वपणे अवलंबून आहोत. झुकेरबर्ग आणि काही व्यवस्थापनातील कर्मचारी हे जास्त जोखमीच्या गोष्टी करतात.

अशा काही प्रमुख गोष्टी ज्यामध्ये खेळ, विमान चालवणे आणि मनोरंजनाच्या काही गोष्टी ज्यामधून अत्यंत गंभीर दुखापत ही होऊ शकते. फक्त हेच नाही तर यामुळे मृत्यूचा धोका देखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामधून मार्क झुकरबर्गचा मृत्यू होऊ शकतो. आता रिपोर्टनुसार विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.