iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!

अॅपल आयफोनप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नव्या फोल्डेबल फोनच्या लाँचनंतर जुने आयफोन स्वस्त होण्याऐवजी त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

iPhone Price Hike : आयफोन 15 ते आयफोन 18, कोणता फोन किती रुपयांनी महागला? वाचा A टू Z किंमत!
iPhone Price Hike
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 6:26 PM

आयफोन प्रेमींना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अॅपल कंपनी त्यांचा नवा फोन बाजारात आणते. पण यावर्षी नवा फोन येणार नसल्याची माहिती आहे. कारण आता आयफोनने यंदा त्यांचा पहिला फोल्डेबल फोन बाजारात आणला आहे. तर आता मात्र अॅपलने पहिल्यांदाच त्यांचा हा नवा फोन लाँच करताना जुने फोन स्वस्त करण्याऐवजी ते महाग केले आहेत. कंपनीने गेल्यावर्षी आयफोन 17 बाजारात आणला होता. यावेळी त्याची किंमत 82,900 रुपये होती. पण आता त्याची किंमत 99,900 करण्यात आली आहे. एवढच नाही तर आयफोन 16 आणि आयफोन एअरच्या किंमतीतही कंपनीने वाढ केली आहे. त्यामुळे या वाढलेल्या आकडेवारीमुळे आयफोनप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे

अॅपलकडून बुधवारी मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं गेलं. ज्यामध्ये Iphone Duo, iPhone 18 Pro सीरिज लाँच केली. परंतू कंपनीने पहिल्यांदाच जुन्या फोनच्या किमंतीत वाढ केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन 17 82,900 रुपयांना विक्रीसाठी बाजारात आणला होता. त्यामध्ये आता तब्बल 22 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे जगभरातील आणि खासकरुन भारतातीलही आयफोन लव्हर्सना मोठा झटका लागला आहे. आयफोन 17च्या 512जीबी व्हरिएंटसाठी आता तब्बल 1,24,900 रुपये मोजावे लागणार आहेत.

तसेच आता आयफोन 17साठीही तुम्हाला जास्तीचे पैसै मोजावे लागणार आहेत. आधी हा फोन 64 हजारांना मिळत होता. आता त्यासाठी तुम्हाला जवळपास 15 हजार रुपये जास्त भरावे लागणार आहेत. हा फोन आता 79,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचवेळी आयफोन 16साठीही तुमच्या खिशाला फटका बसणार आहे. हा फोन आधी 69,900 रुपयांना मिळायचा, कंपनीने आता या फोनची किंमत 89,900 रुपये केली आहे.

आयफोन एअरची आधीची किमंत 1,19,900 रुपये होती. आता हा फोन 1,49,900 रुपयांना खरेदी करता येईल. आयफोन 17 प्रोची सुरुवातीची किमंत 1,34,900 रुपये आहे. आणि नव्या आयफोन 18 प्रोची सुरुवातीची किंमत 1,64,000 आहे. तर आयफोन 17 प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत 1,49,000 रुपये होती. आता आयफोन 18 प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत ही 1,79,900 रुपये करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us