हा माणूसच वेगळा आहे राव… 29 व्या वर्षी 3.2 अब्ज डॉलर नेटवर्थ, पण साधी चप्पल घालून फिरतो; नाव ऐकून…

मेटाचे चीफ AI ऑफिसर, कमी वयात अब्जाधीश बनलेल्यांच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे. अलीकडील मेटा इव्हेंटमध्ये त्यांच्या साध्या कॅज्युअल लूकमुळे चर्चेत आले. या इव्हेंटमध्ये ते साधी चप्पल आणि टी-शर्टमध्ये दिसले. त्यांच्या कॅज्युअल लूकची चर्चा सुरू झाल्यावर खुद्द त्यांनीच आपल्या आऊटफिटची किंमत सांगितली.

हा माणूसच वेगळा आहे राव... 29 व्या वर्षी 3.2 अब्ज डॉलर नेटवर्थ, पण साधी चप्पल घालून फिरतो; नाव ऐकून...
| Updated on: Sep 25, 2026 | 5:13 PM

Meta Connect चा एक इव्हेंट नुकताच पार पडला. यावेळी टेक्नॉलॉजी आणि AI प्रोजेक्ट्सची चर्चा तर झालीच. पण याच इव्हेंटमध्ये एका वेगळ्याच कारणामुळे अलेक्झांडर वांग सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले. मेटाचे चीफ AI ऑफिसर असलेले वांग हे या मंचावर मेटाच्या ‘म्यूझ’ या सर्वात महत्वाकांक्षी AI प्रोजेक्ट बद्दल बोलण्यासाठी आले होते खरे.. पण त्यांच्या प्रेझेंटेशनपेक्षा त्यांच्या साध्या लूकनेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण अतिशय मोठ्या अशा या इव्हेंटमध्ये वांग यांनी कोणताही महागडा सूट किंवा लक्झरी ब्रँडचा चमकदार आउटफिट घातला नव्हता. त्याउलट ते कॅमोफ्लाज टी-शर्ट, काळी पँट आणि क्रॉक्स घालून मंचावर आले.  त्यांचा हा साधा आणि कॅज्युअल लूक बघता बघता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आणि लोकांनी त्यांच्या कपड्यांच्या किमतीचा अंदाज व्यक्त करायला सुरूवात केली.

800 डॉलरच्या टी-शर्टचा अंदाज, पण खरी किंमत फक्त ..

मेटाच्या या इव्हेंटमध्ये अलेक्झांडर वांग तिथल्या मंचावर दिसताच सोशल मीडियावर त्यांच्या लूकची, टी-शर्टची चर्चा सुरू झाली. त्यांचा टी-शर्ट एखाद्या महागड्या लक्झरी ब्रँडचा असेल असं अनेकांना वाटलं. त्याची किंमत तब्बल 800 डॉलरपर्यंत असू शकते, असा अंदाज इंटरनेटवर अनेक युजर्सनी व्यक्त केला.

मात्र त्यानंतर वांग यांनीच या चर्चेबद्दल खुलासा केला. आपण घातलेला कॅमोफ्लाज टी-शर्ट सांताक्रूझमधील एका थ्रिफ्ट स्टोअरमधून खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याची किंमत फक्त् 30 डॉलर्स होती, असंही त्यांनी नमूद केलं. तर त्यांच्या क्रॉक्सची किंमत फक्त 60 डॉलर्स असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एवढंच नव्हे तर मजेशीर अंदाजात त्यांनी आपल्या अंडरवेअरची किंमतही सांगितली. त्याची किंमत सुमारे 5 डॉलर असल्याचं ते म्हणाले.

म्हणजेच, सोशल मीडियावर ज्या आउटफिटला सुरुवातीला महागडा आणि लक्झरी फॅशन लूक समजलं जात होतं, प्रत्यक्षात तो लूक अत्यंत साधा आणि तुलनेने स्वस्त होता.

सिलिकॉन व्हॅलीच्या पारंपरिक लूकपेक्षा वेगळी स्टाइल

अलेक्झांडर वांग यांचा हा लूक सिलिकॉन व्हॅलीतील पारंपरिक कॉर्पोरेट स्टाइलपेक्षा नक्कीच वेगळा होता. मोठ्या टेक कंपनीच्या AI स्ट्रॅटेजीची जबाबदारी सांभाळणारा अधिकारी मंचावर साध्या टी-शर्ट आणि क्रॉक्समध्ये दिसणे अनेकांसाठी लक्षवेधी ठरलं. याच कारणामुळे त्यांच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली. विशेषतः तरुण इंटरनेट युजर्समध्ये त्यांच्या कॅज्युअल स्टाइलची चर्चा झाली.

कोण आहेत अलेक्झांडर वांग ?

अलेक्झांडर वांग हे AI क्षेत्रातील खूप ओळखीचं नाव आहे. 2016 मध्ये त्यांनी Scale AI या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम्सना प्रशिक्षण देण्यासाठी डेटा उपलब्ध करून देणे आणि AI मॉडेल्स अधिक चांगली बनवण्यासाठी कंपन्यांसोबत काम करते. ते बराच काळ Scale AI चे CEO होते.

त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे, 2025 साली मेटाने Scale AI मोठी हिस्सेदारी घेतल्यानंतर अलेक्झांडर वांग हे मेटामध्ये चीफ AI ऑफिसर म्हणून सहभागी झाले. 2026 मध्ये त्यांचं वय 29 असून त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचे विविध रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे ते टेक इंडस्ट्रीतील तरुण आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणूनही ओळखले जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us