नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?

Nokia 300 Charge: नोकिया कंपनीने नवीन फीचर फोन लाँच केला आहे. नोकिया कंपनीच्या या नवीन फोनची बाजारात चर्चा आहे. काय आहेत त्याचे फीचर्स आणि किती आहे किंमत?

नोकियाचा नवीन फीचर फोन लाँच, 40 दिवस टिकणार बॅटरी, किंमत किती?
Nokia 300 Charge
| Updated on: Aug 26, 2026 | 8:22 PM

नोकिया कंपनीने रक्षाबंधनाच्या सुरूवातीलाच एक खास फीचर फोन लाँच केला आहे. नोकिया 300 चार्ज या नावाने हा फोन बाजारात आणला आहे. या फीचर फोनमध्ये 3,700 एमएएचची मोठी बॅटरी आहे. हा फोन मजबूत आणि खास रंगात उपलब्ध आहे. या फोनमध्ये वरील बाजूला एक टॉर्च देण्यात आली आहे. रात्री शेतात अथवा अंधारात ही बॅटरी उपयोगी पडणार आहे. हा टॉर्च चांगला प्रकाशझोत देतो. या फोनची कंपनीने फिलिपिन्समध्ये घोषणा केली आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे.

या फोनची किंमत किती?

नोकिया 300 चार्जची किंमत फिलिपिन्समध्ये 2,190 पेसो म्हणजे 3,400 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक, सँडस्टोन आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहे. फोनचा आकार 166.55x 55x 14.94 मिमी असा आहे. त्याचे वजन 138 ग्रॅम इतके आहे. हा मोबाईल युएसबी टाईप सी पोर्टने चार्ज होतो. या पोर्टद्वारे 10 वॅट रिव्हर्स चार्जिंग शक्य आहे. एका चार्जमध्ये हा फीचर फोन 37 तास बोलण्याची आणि 40 दिवस स्टँडबायची खात्री देतो.

या फोनची खास वैशिष्ट्ये : या फीचर फोनचा डिस्प्ले 2.4 इंचाचा क्यूव्हीजीए असा आहे. तसाच क्युव्हीजए रिझोल्यूशनचा कॅमेरा आहे. यामध्ये एचएमडीचे एस 30+ हे सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे. फीचर फोनमध्ये युनिसॉक एससी6531ई हे प्रोसेसर वापरल्या गेले आहे. या फोनची रॅम 4 एमबी आणि अंतर्गत स्टोरेज 4 एमबी इतके आहे. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येते. हा फोन केवळ जीएसएम 900/100 2 जी बँडला सपोर्ट करतो. यातील टॉर्च ही विजेरी म्हणून वापरता येते. रिव्हर्स चार्जिंग फीचरमुळे इतर उपकरणं सहज चार्ज करता येतात. यामध्ये 3,700 एमएएचची मोठी बॅटरी आहे. केवळ फीचर फोनची आवड असणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय मानल्या जात आहे.

नोकियाचे एआय फीचर फोन : नोकियाने अलिकडे एआय फीचर फोनही जाहीर केले आहेत. नोकिया 235 5जी, नोकिया 215 4जी, नोकिया 210 4जी असे काही निवडक फोन बाजारात उतरवण्यात आले आहे. या फोनमध्ये एआय अस्टिस्टंट बटण देण्यात आले आहे. व्हाईस कमांडच्या सहाय्याने युझर्सला हा फोन ऑपरेट करता येतो. ग्रामीण भागात अजूनही फीचर फोनची लोकप्रियता कायम आहे. तर अनेक जण दुय्यम पर्याय म्हणून फीचर फोनचा वापर करतात. यातील बॅटरी बॅकअप आणि स्मार्टफोनची कोणतीही कटकट नसल्याने जगाच्या गोंधळापासून दूर राहता येते.

Follow Us