WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपवर आता प्रत्येक कामं होणार सोपं! जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत

| Updated on: Jun 02, 2023 | 4:23 PM

मेटा कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच नवं फीचर्स येणार आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला आपल्या गरजेनुसार कनेक्ट करणं सोपं होणार आहे. कसं आहे नवं फीचर जाणून घेऊयात

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपवर आता प्रत्येक कामं होणार सोपं! जाणून घ्या नव्या फीचर्सबाबत
WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच येणार नवं फिचर्स, प्रत्येक कामात होणार अशी मदत
Follow us on

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे हे अ‍ॅप आपल्याला पाहायला मिळतं. वापरण्यास अगदी सोपं असल्याने त्याची लोकप्रियताही वाढली आहे. हल्ली लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे मेटा कंपनी या अ‍ॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत आहे. त्यामुळे वापरकर्त्याना व्हॉट्सअ‍ॅपवर चांगला अनुभ घेता येणार आहे. बरेच नवे फीचर्स येणाऱ्या काळात अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखीन मजेशीर होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता अँड्रॉईड बीटी फीचर विकसित करत आहे. यामुळे वापरकर्त्यांना फिल्टरच्या माध्यमातून नवे चॅनेल शोधण्याची परवानगी मिळणार आहे. Wabetainfo नुसार, साइट नवीन फीचर्ससाठी नवीन विंडो सादर करेल. ही विंडो वापरकर्त्यांना विशिष्ट चॅनेल शोधण्याची परवानगी देईल.

चॅनेल फीचर सुरू झाल्यानंतर तुम्ही हजारो लोकांसोबत बातम्या, घटना इत्यादींची माहिती शेअर करू शकाल.युजर्स नवीन विभागात चॅनेलचे नाव टाइप करून चॅनल शोधू शकतात. युजर्सन नवीन विंडोत तीन फिल्टरच्या मदतीने चॅनेल शोधू शकतील. अलीकडे जोडले गेलेलं, लोकप्रियता आणि वर्णक्रमानुसार आपल्या चॅनेलचा शोध घेऊ शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. तुम्ही चॅनेलमध्ये सामील झाल्यावर, इतर फॉलोअर्स तुमचे नाव, फोन नंबर, प्रोफाइल फोटो किंवा अबाउट सेक्शन पाहू शकणार नाहीत. सध्या हे फीचर बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सर्वांना ही सोय उपलब्ध होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप चॅनल युजर्ससाठी इतर युजर्सशी कनेक्ट होण्यासाठी आणि माहिती सामायिक करण्यासाठी एक नवीन खासगी जागा आहे. यामध्ये युजर्सच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही. चॅनेलद्वारे, तुम्ही विशिष्ट प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे अपडेट शेअर करू शकता.

विशेष म्हणजे युजर्सना त्यांच्या आवडीचे चॅनेलची सदस्यता घेण्याचे नियंत्रण असेल. तसेच कोण कोणाला फॉलो करतो हे युजर्सना कळणार नाही. दुसरीकेड चॅनेलमध्ये थेट कोणाला अ‍ॅड करता येणार नाही. जिथपर्यंत युजर्स सदस्यता घेत नाही तो पर्यंत काहीच करता येणार नाही.