AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 Years of PM Modi: नऊ वर्षात डिजिटल इंडियाची व्याप्ती कुठवर पोहोचली? मोदी सरकारने आणलेल्या अ‍ॅप्सची माहिती जाणून घ्या

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्षात मोदी सरकाने बरेच मोठे निर्णय घेतले. तसेच जनतेची कामं सोपी व्हावी यासाठी काही अॅप्सही लाँच केले, जाणून घेऊयात याबाबत...

9 Years of PM Modi: नऊ वर्षात डिजिटल इंडियाची व्याप्ती कुठवर पोहोचली? मोदी सरकारने आणलेल्या अ‍ॅप्सची माहिती जाणून घ्या
9 Years of PM Modi: नऊ वर्षात डिजिटल इंडियाची व्याप्ती कुठवर पोहोचली? मोदी सरकारने आणलेल्या अ‍ॅपची माहिती जाणून घ्या
| Updated on: Jun 01, 2023 | 5:49 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात डिजिटल क्रांती सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी कामांना होणारी दिरंगाई पाहता मोदी सरकारने अनेक अ‍ॅप्स लाँच केले. या माध्यमातून सरकारी कार्यालयात सर्वसामान्यांचे हेलपाटे कमी झाले आणि कामं एका क्लिकवर पूर्ण व्हायला लागली. यामध्ये सरकारने BHIM UPI, UMANG, COWIN, Aarogya Setu, Sanchaar Sathi आणि Digilocker अ‍ॅप्स लाँच केले.

DIGILOCKER :  डिजिलॉकर हे एक सरकारी अ‍ॅप आहे. अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या डिजिटल प्रती सांभाळून ठेवू शकता. हे अ‍ॅप 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. यामध्ये तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची आरसी,  मार्कशीट इत्यादी सेव्ह करू शकता. या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना 1 GB स्टोरेज दिला असून जेव्हा गरज असेल तेव्हा कागदपत्रं स्टोअर करू शकता.

BHIM UPI :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2016 मध्ये डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत सामान्य लोकांच्या सोयीसाठी हे अ‍ॅप लाँच केले. या अ‍ॅपद्वारे कोणताही वापरकर्ता सहजपणे आर्थिक व्यवहार करू शकतो. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो. इतकंच नाही तर या अ‍ॅपद्वारे बिल पेमेंट आणि मोबाइल रिचार्ज देखील करता येते.

UMANG APP : उमंग अ‍ॅप 2017 मध्ये सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आणले होते. या अ‍ॅपद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक सेवांचा लाभ लोकांना घरबसल्या मिळतो. अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे निकाल पाहू शकता, नोकरदार लोक EPFO ​​बद्दल माहिती जाणून घेऊ शकतात, आधार सेवेबाबत माहिती मिळते. तसेच स्वयंपाकाच्या गॅस बुकिंगसह अनेक सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकतात.

COWIN : कोविड 19 महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हे अ‍ॅप लॉन्च केले होते. हे अ‍ॅप लसीकरण मोहिमेसाठी आणले होते. कोरोना लसीकरणात या अ‍ॅपने महत्त्वाची भूमिका बजावली.  कोविन अ‍ॅपद्वारे कोरोना लसीकरणाची सुलभ झाली आणि  कोट्यवधी लोकांना याचा फायदा कोरोना कार्यकाळात झाला.

AAROGYA SETU APP : आरोग्य सेतू अ‍ॅप सरकारने 2020 मध्ये लॉन्च केले होते. अ‍ॅपमध्ये सेल्फ असेसमेंट टेस्टचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही योग्य माहिती भरल्यास तुम्हाला कोरोनाचा धोका किती आहे हे हे अ‍ॅप दाखवते. लोकेशन इनेबल केल्यानंतर हे अ‍ॅप तुमच्‍या आजूबाजूला संक्रमित व्‍यक्‍तीबाबत माहिती देते. यासोबतच सर्वसामान्यांच्या सोयीसाठी या अ‍ॅपमध्ये इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत.

SANCHAAR SATHI : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर टेन्शन येते. पण जनतेचा हा टेन्शन दूर करण्यासाठी सरकारने संचार साथी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने वापरकर्ते त्यांचा हरवलेला फोन ब्लॉक करू शकतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.