10,000mAh बॅटरीवाला रेडमी नोट 17 प्रो सीरीज लाँच, किती आहे किंमत आणि फिचर्स

रेडमी नोट 17 प्रो आणि रेडमी नोट 17 प्रो मॅक्स भारतात लाँच झाला आहे. दोन्ही फोनमध्ये 6.83 इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले,120Hz रिफ्रेश रेट आणि हायपर ओएस 3 देण्यात आला आहे.

10,000mAh बॅटरीवाला  रेडमी नोट 17 प्रो सीरीज लाँच, किती आहे किंमत आणि फिचर्स
Redmi Note 17 Pro and Redmi Note 17 Pro Max
| Updated on: Sep 15, 2026 | 5:02 PM

शाओमीने मंगळवारी भारतात रेडमी नोट 17 प्रो आणि रेडमी नोट 17 प्रो मॅक्स लाँच केला आहे. दोन्ही फोनमध्ये 6.83 इंचाची 1.5K एमोलेड डिस्प्ले,120Hz रिफ्रेश रेट आणि हायपरओएस 3 देण्यात आला आहे. प्रो मॅक्स मॉडेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 10,000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री याच महिन्यात सुरु होणार आहे.

1.5K एमोलेड डिस्प्लेचा फोन

रेडमी नोट 17 प्रो आणि प्रो मॅक्समध्ये 6.83 इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200Hz टच सँपलिंग रेटला सपोर्ट करते. याची पिक ब्रायटनेस 3,500 निट्स पर्यंत आहे. शाओमीच्या मते डिस्प्ले 12-बिट कलर टेक्नोलॉजीसोबत 68.7 अब्जापर्यंत रंग दाखवू शकते. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टवाला स्टिरिओ स्पीकर देण्यात आला आहे.

50MP कॅमरा आणि हायपर ओएस 3

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे. ज्यात 50MP चा कॅमरा आणि 8MPचा सुपर-वाईड-एंगल कॅमरा देण्यात आला आहे. प्रो मॅक्समध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर स्टँडर्ड प्रो मॉडेल मध्ये 16MP सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात ग्लेअर हटवून रिफ्लेक्शन कमी करणे आणि ऑब्जेक्ट हटवणे सारखे एआय फिचर्स देखील आहेत.

दोन्ही फोनवर हायपरओएस 3 वर चालतात, जे एड्रॉईड 16 वर आधारित आहे. शाओमी 4 वर्षांच्या ओएस अपडेट आणि 6 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट देण्याची गॅरंटी देते. दोन्ही मॉडेलना IP66, IP68 आणि IP69K रेटिंग मिळते. प्रो मॅक्समध्ये फोटोक्रोमिक रिअर पॅनलचा पर्याय मिळते. जो थेट उन्हात आपला रंगाची शेड बदलू शकतो.

10,000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग

रेडमी नोट 17 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 6s झेन 4 प्रोसेसर आणि 8GB पर्यंतचा रॅम दिलेली आहे. यात 9,000mAh च्या सिलीकॉनची कार्बनची बॅटरी असून जी 67W चार्जिंगला सपोर्ट करते. तर प्रो मॅक्समध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6 झेन 5 चिपसेट,12GB पर्यंत रॅम आणि 10,000mAh ची बॅटरी दिलेली आहे. हा फोन 100W चार्जिंगला सपोर्ट करतो. शाओमीनुसार प्रो मॅक्सची बॅटरी 1,600 हून ज्यास्त चार्जिंग सायकलनंतरही 80 टक्के क्षमता कायम ठेवतो. यात 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग देखील मिळते.

किंमत आणि विक्री तारीख

रेडमी नोट 17 प्रोची सुरुवातीची किंमत 33,999 रुपये आहे. ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडलची किंमत 36,999 रुपये आहे. तर रेडमी नोट 17 प्रो मॅक्सच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 50,999 रुपये आहे. शाओमी नव्या स्मार्टफोनवर 5,000 रुपयांपर्यंत बँकचा डिस्काऊंट देखील देण्यात येणार आहे. रेडमी नोट 17 प्रोची विक्री 17 सप्टेंबर आणि प्रो मॅक्सची विक्री 23 सप्टेंबरपासून होणार आहे. दोन्ही फोन Amazon, शाओमीच्या ऑनलाईन स्टोर आणि फिजिकल आऊटलेटवर होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us