अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सला सावधानतेचा इशारा ! भारत सरकारने दिल्या सूचना, हे काम तातडीने करा अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

| Updated on: May 11, 2022 | 5:04 PM

IT मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्संसाठी एक नवीन अलर्ट जारी केला आहे. हा हाय अलर्ट Android 10, Android 11, Android 12 युजर्ससाठी आहे.

अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सला सावधानतेचा इशारा ! भारत सरकारने दिल्या सूचना, हे काम तातडीने करा अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
Image Credit source: Instagram
Follow us on

आयटी मंत्रालयाच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्संसाठी एक नवीन अलर्ट जारी केला आहे. हा हाय अलर्ट Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L च्या युजर्संसाठी आहे. सुत्रांनुसार, अनेक असुरक्षीत ऑपरेटिंग सिस्टममध्ये (In insecure operating systems) दिलेल्या वर्णनानुसार, आपल्या फोनमधील संवेदनशील माहिती (Sensitive information)कोणीही सहज मिळवू शकते. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT) ने अँड्रॉइड युजर्संसाठी एक चेतावणी जारी केली आहे. ही चेतावणी Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L वापरणाऱयांना दिली असून, या अँड्रॉइड आवृत्त्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेत, हॅकर्स युजर्संची संवेदनशील माहिती मिळवू शकतात. अॅडव्हायझरीमध्ये असे सांगण्यात आले आहे की Android OS मधील या त्रुटी फ्रेमवर्क, सिस्टम घटक, मीडिया प्रोव्हायडर, प्रदाता, कर्नल घटक, मीडियाटेक, क्वालकॉम, क्वालकॉम क्लोज्ड सोर्स घटक आणि सिस्टममधील प्रवाहामुळे (Due to the flow in the system)आहेत.

गुगल ने आधीच दिला होता इशारा

Google ने आधीच Android OS मध्ये या असुरक्षा मान्य केल्या आहेत आणि या महिन्याच्या सुरुवातीला एक सुरक्षा पॅच जारी केला आहे. अलीकडील Android सुरक्षा बुलेटिननुसार 1 मे 2022 किंवा नंतरचे सुरक्षा पॅच या सर्व समस्यांचे निराकरण करते. कंपनीच्या मते, यातील सर्वात गंभीर समस्या फ्रेमवर्क घटकातील उच्च सुरक्षा बग आहे. Android प्लॅटफॉर्मच्या नवीन व्हर्जनमध्ये सुधारणा करून Android वरील अनेक समस्यांचे निराकरण करणे अधिक कठीण केले आहे. हेच कारण आहे की Google सर्व युजर्संना शक्य असेल तेथे Android च्या नवीन आवृत्तीवर अपडेट करण्यास सांगत आहे.

त्वरीत करा नवीन अपडेट

फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम तपासू शकता. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर अँड्रॉइड सिस्टम अपडेटवर क्लिक करून अपडेटची माहिती तुम्ही मिळवू शकता. अपडेट उपलब्ध झाल्यानंतर, ते डाउनलोड करा आणि फोनमध्ये अपडेट करा.

हे सुद्धा वाचा