बाबो… वयाच्या 60 व्या वर्षी दिला मुलीला जन्म; दोन वर्षांपूर्वीही होती गरोदर; नेटकरीही थक्क
वयाच्या 60 वर्षी महिलेने मुलीला जन्म दिला आहे. महिला दोन वर्षांपूर्वी गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.. सध्या महिलेची कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे... तर जाणून घ्या महिला नेमकं म्हणाली तरी काय?

अनेकांचं असं म्हणणं असतं की, वयाच्या कुटुंब नियोजन झाल्यानंतर आई – वडिलांची साठी येई पर्यंत मुलं त्यांच्या आयुष्यात सेट होतील… पण एका महिने तर वयाच्या 60 व्या वर्षी मुलीला जन्म दिला आणि दोन वर्षांपूर्वी ती एका मुलाची आई झालेली. या महिलेची कथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 17 सप्टेंबर रोजी महिलने वयाच्या 60 व्या वर्षी मुलीचं स्वागत केलं. बाळाचं वजन 2.8 किलो सांगितलं जात आहे. ऑपरेशनच्या माध्यामातून महिलेने मुलीचं जगात स्वागत केलं आहे. आता तु्म्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की, महिलेचं नाव काय आणि ती कुठे राहते…
तर समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेचं आडनाव झांग असं सांगितलं जात असून, ती चीन येथे राहाते. रिपोर्टनुसार, महिलेने पुन्हा कुटुंब सुरु करण्याचा निर्णय घेतला कारण, चार वर्षांपूर्वी तिने तिच्या एकुलत्या एका मुलाला गमावलं. याच दुःखात तिने पुन्हा कुटुंब सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिला, त्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी मुलीचं जगात स्वागत केलं. मुलीच्या जन्मनंतर आता महिलेच्या कुटुंबात दोन मुलं आहेत. झांगचं असं म्हणणं आहे की, त्यांना दोन्ही मुलांना एकत्र वाढताना पाहायचं आहे.
वयाच्या 60 व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महिलेवर अनेकांनी टीका केली. पण महिलेचं असं म्हणणं आहे की, ती स्वतःला वयस्कर मानत नाही. महिलेला आजही असं वाटतं की, ती आजही तरुण आणि स्वस्थ आहे. एका रिपोर्टनुसार, झांग हिने सांगितलं आहे की, ती फक्त 28 वर्षांची आहे. महिलेचं असं म्हणणं आहे की, ती अद्यापही जिवंत आहे आणि जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत, तोपर्यंत त्यांची साथ देऊ शकेल अशा स्थितीत राहिल…
यावेळी महिले तिच्या कुटुंबियांचं उदाहरण दिलं आहे. महिलेच्या वडिलांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, तर आई आता 94 वर्षांची आहे आणि तिला ऐकता देखील येतं आणि पाहता देखील येतं. एवढंच नाही तर, महिलेची आई पायऱ्या देखील चढते. रिपोर्टनुसार, झांग यांच्या पतीने देखील सुरुवातीला या वयात मूल जन्माला घालण्याच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, झांग यांनी त्यांना आपण या निर्णयासाठी तयार असल्याचं आश्वस्त केलं. त्यांचं म्हणणं आहे की, त्या आपल्या निर्णयावर खूश आहेत आणि आता मुलगा आणि मुलगी दोघेही असल्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
झांग यांची ही कथी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही जण इतक्या वयात आई बनण्यावरून आणि मुलांच्या संगोपनाबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. याच कारणामुळे झांग यांच्या या कथेने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.