अजब परंपरा, जिवलगाच्या मृत्यूनंतर त्याची राख सुपात भिजवून खातात हे लोक…
जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मृत्यू आणि अंत्यसंस्कारांबद्दल वेगवेगळ्या परंपरा आहेत. एका समाजासाठी जे सर्वसामान्य वाटते, ते दुसऱ्या समाजाला विचित्र वाटू शकते. एका समुदायाच्या अनोख्या अंत्यसंस्कार परंपरांबद्दल जाणून घेऊया...

जगात निरनिरळ्या समुदात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी मृतदेह दफन केले जातात. हिंदू धर्मात मृतदेहांना जाळले जाते.तर काही ठिकाणी नदीत आणि समुद्रात प्रेतांना सोडले जाते. काही ठिकाणी मृतदेहांना दफन केले जाते. परंतू एका जमातील मृतदेहांच्या राखेला आपल्या अन्नात मिक्स करुन सेवेन केले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या यनोमामी जमातीत अंतिम संस्काराची जगावेगळी परंपरा आहे. अंत्य संस्कारानंतरचा विधीचा विचित्र प्रकार पाहून तुम्हाला धक्काच बसेल. ब्राझील आणि व्हेनेझुएला येथील अमेझॉन क्षेत्रात आदिवासी जमातीत मृत व्यक्तीच्या देहाला जाळल्यानंतर त्याच्या उरलेल्या अवशेषातील हाडे आणि राखेला खास पद्धतीने सांभाळून ठेवले जाते. अंतिम संस्काराच्या या प्रक्रियेत या अवशेषांना वाटून राखेत मिक्स केले जाते. त्यानंतर केळाच्या एका सुपमध्ये या राखेला मिक्स करुन त्याचे सामुहिकपणे सेवन केले जाते. ही परंपरा ऐकून तुम्हाला अजब वाटू शकते. परंतू यनोमामी लोकांसाठी याचा संबंध आपल्या प्रियजनांचा मृ्त्यू, आत्मा आणि अंतिम निरोपाशी आहे.
मृतदेहाला जाळल्यानंतर काय करतात ?
द गार्जियन नायजेरियाच्या बातमीनुसार यनोमामी समाजात अंतिम संस्कारला केवळ मृत शरीराला समाप्त करण्याची प्रक्रिया मानली जात नाही. हा मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या निरोपाशी जोडलेली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे.
मृत व्यक्तीच्या मृतदेहाला जाळले जाते. त्यानंतर उरलेल्या हाडे आणि राखेला एकत्र केले जाते. उपलब्ध विवरणानुसार या राखेचा एक हिस्सा अंतिम संस्काराशी जुडलेल्या सामुदायिक समारंभात केळ्याच्या सूपात मिक्स करुन ग्रहण केले जाते.
अखरे राख सेवनाची गरज का ?
यनोमामी लोकांच्या मान्यतेनुसार मृत्यूनंतर शरीराला मागे सोडणेच पुरेसे नाही. त्यांच्यासाठी अंतिम संस्काराचा हेतू मृत व्यक्तीचा आत्म्याला जिवित लोकांच्या जगापासून वेगळे करणे आणि त्याचा पुढील प्रवास सुनिश्चित करणे आहे.
सर्व्हायल इंटरनॅशनलच्या मेत यनोमामी लोकांसाठी मृत व्यक्तीच्या शरीर आणि त्यांच्या वस्तूंना सांभाळून ठेवण्याची परंपरा देखील सामान्य नाही. अंतिम संस्कारानंतर मृत व्यक्तीच्या भौतिक वस्तूंना नष्ट केले जाते. आणि त्याचे नाव पुन्हा घेणे टाळले जाते.
अंतिम संस्काराशी जोडलेला एक सामुदायिक समारंभ देखील असतो, त्याला रिहू म्हटले जाते. या दरम्यान समुदायाचे लोक एकत्र जमतात. मृत व्यक्तीच्या राखेचा काही हिस्सा केळाच्या सुपात मिक्स केला जातो. आणि समारंभात सामील लोक त्याला ग्रहण करतात. मृत व्यक्तीला आपल्या समुदायात अंतिम रुपाने समाहित करणे आणि त्याच्या आत्म्याचा अंतिम प्रवास सुखाचा करण्याच्या रुपात समजले जाते.