Coldplay : कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये चेहऱ्यावर स्पॉटलाइट आला अन् बिंग फुटलं.. Astronomer च्या CEO सोबत काय घडलं ?

कोल्डप्ले कॉन्सर्टमधील Astronomerचे सीईओ अँडी बायर्न आणि त्यांच्या कंपनीच्या HC चीफ क्रिस्टिन कॅबोट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यानंतर त्यांच्या अफेअरबद्दल विविध चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप निकट होते, असे दिसून आले. मात्र स्पॉटलाईट त्यांच्यावर येताच CEO थेट खाली लपले तर क्रिस्टीनने तोंडच फिरवलं.

Coldplay : कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये चेहऱ्यावर स्पॉटलाइट आला अन् बिंग फुटलं.. Astronomer च्या CEO सोबत काय घडलं ?
कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये बिंग फुटलं
Image Credit source: social media
| Updated on: Jul 18, 2025 | 11:08 AM

लहान-मोठ्यांपासून, तरूणांमध्येही ‘कोल्डप्ले’ हा बँड खूप प्रसिद्ध आहे. सध्या या बँडच्या जगभरात कॉन्सर्ट्स सुरू असून नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्ट दरम्यान, असे काही घडले ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरू आहे. खरंतर, फ्रंटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिस मार्टिनने अलीकडेच त्याच्या एका परफॉर्मन्स दरम्यान एका कपलवर स्पॉटलाइट टाकला.’किस कॅम’चा लाइट ज्या जोडप्यावर पडला ते कोणी सामान्य जोडपे नव्हते तर अ‍ॅस्ट्रोनॉमर (Astronomer)या टेक कंपनीचे सीईओ आणि एचआर प्रमुख होते.

सीईओच्या अफेरचं बिंग फुटलं

कोल्डप्लेचा गायक क्रिस मार्टिनने एका कॉन्सर्ट मध्ये त्याच्या परफॉर्मन्स दरम्यान ‘किस कॅम’ वापरला आणि कॅमेऱ्याने मोठ्या पडद्यावर एक जोडपं दाखवल्यवर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. त्या स्पॉटलाइटमुळे सगळ्यांचं लक्ष एका पुरूष आणि एका महिलेवर गेले जे एकमेकांसोबत अतिशय कोझी वातावरणात या परफॉर्मन्सचा आनंद घेत होते. पण स्पॉटलाइचा फोकस आणि कॅमेरा त्यांच्यावर रोखला गेला आणि दोघांनाही मोठा धक्का बसला. त्यातील पुरूषाने तर लगेच खाली बसले आणि त्या महिलेने लगेच पाठव फिरत चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. तरीही काय घडले हे कोणालाही समजू शकले नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल होताच यअनेकांना धक्का बसला कारण त्याजोड्यातील पुरूष हा कोणी साधासुधा माणूस नव्हे तर अ‍ॅस्ट्रोनॉमर या प्रसिद्ध कंपनीचा सीईओ अँडी बायरन आणि ती महिला म्हणजे एचआर प्रमुख क्रिस्टीन कॅबॉट, हे दोघे होते.

दोघं खूप लाजाळू आहेत नाहीतर..

यानंतर ख्रिस मार्टिनने विनोदी जंगात म्हटलं की ‘हे बघा, हे दोघे जण… कदाचित त्यांचं अफेअर असेल किंवा ते खूप लाजाळू असतील.’ ख्रिसची ही मजेदार शैली पाहून तिथले बहुतेक लोक हसायला लागले.मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच, त्याीची प्रचंड चर्चा झाली. बघता बघता अवघ्या काही वेळातच हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. अँडी सध्या विवाहित आहे आणि मेगन केरिगन बायर्न त्याची पत्नी आहे, त्यामुळे या प्रकरणात आता नवा मोठा ट्विस्ट आला आहे.

 

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या तिखट प्रतिक्रिया

बायरन आणि त्यांच्या एचआर प्रमुखाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे, कारण बायरन विवाहित आहे आणि या व्हिडिओमुळे दोघांमध्ये अफेअर असल्याची अटकळ बांधली जात आहे. सोशल मीडियावरील यूजर्स तर या व्हायरल व्हिडिओवर अतिशय तीव्र, तिखट प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या पत्नीसाठी वाईट वाटतंय, असं एकाने लिहीलं. तर सगळ्याच वाईट काय असतं, हे समजणं की तुमच्या पार्टनरला कोलप्ले आवडतं की त्याचं अफेर आहे हे समजणं, ?असा उपरोधिक सवाल एकाने विचारलाय.

काही यूजर्सनी तर याला याला “इंटरनेटवरील सर्वात मोठा स्कँडल” म्हटलं, पण काहींनी सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करण्याच्या बायर्न आणि कॅबोटच्या मूर्खपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका कमेंटमध्ये असे लिहिले होते: ‘जर तुमचे प्रेमसंबंध असतील तर तुम्ही संगीत कॉन्सर्टसारख्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी का जाल?’ अँडी बायर्न कोण आहे? असा सवाल एकाने विचारला आहे.

अँडी बायर्न कोण आहे ?

अ‍ॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्नचे लग्न मेगन केरिगन बायर्नशी झाले आहे आणि तो त्याच्या दोन मुलांसह न्यू यॉर्कमध्ये राहतो. तर या घटनेनंतर मेगनने तिच्या प्रोफाइलमधून बायर्न आडनाव काढून टाकले आहे, असा दावा काहींनी केला आहे. यामुळे त्यांच्या तिच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मेगनने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.