शाहजहाँने मुमताजसाठी ताजमहाल बांधला, झोउने पण बायकोसाठी जे केलं त्याला तोड नाही

एका व्यक्तीने त्याच्या बायकोची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क राहते घर विकले आणि अख्ख डोंगर... आता नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया...

शाहजहाँने मुमताजसाठी ताजमहाल बांधला, झोउने पण बायकोसाठी जे केलं त्याला तोड नाही
Couple
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 18, 2026 | 1:18 PM

म्हणतात की प्रेम खरे असेल तर माणूस अशक्यही शक्य करून दाखवतो. मोठमोठे डोंगर फोडून टाकतो. अलीकडेच चीनच्या सिचुआन प्रांतातील झोऊ शाओलिन (Zhou Xiaolin) यांनी आपल्या पत्नी यिन जी (Yin Jie) साठी असेच काहीतरी करून दाखवले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, २०१३ मध्ये यिन जी यांनी फक्त असंच आपल्या पतीसमोर बालपणातील आवडत्या हॉलीहॉक फुलांचा उल्लेख केला होता. त्यानंतर झोऊ यांनी त्यांना वचन दिले की एक दिवस ते त्यांच्यासाठी एक पूर्ण बाग तयार करतील. आपल्या पत्नीच्या बालपणातील आठवणी जपण्यासाठी झोऊ यांनी ८० हेक्टर पडीक जमीन जगातील सर्वात मोठ्या हॉलीहॉक गार्डनमध्ये रूपांतरित केली.

घर विकून पडीक जमीन फुलांच्या ‘जन्नत’त रूपांतरित केली

कोणताही गार्डनिंगचा अनुभव नसताना झोऊ यांनी आपले घरही विकले आणि ट्रुआनलोंग टाउनमध्ये जमीन खरेदी केली. त्यांनी १० वर्षे कष्टाने काम केले, देशी आणि विदेशी बिया शोधल्या आणि ८० हेक्टरची पडीक दरी फुलांनी सजवली. आज ही जागा जगातील सर्वात मोठे हॉलीहॉक गार्डन बनली आहे. यात हॉलीहॉकच्या ७०० हून अधिक जाती, १.५ लाख लिली आणि १ लाख हिबिस्कसची रोपे आहेत.

बर्फवृष्टीत ३ दिवस गुहेत

या जोडप्याची पहिली भेट १९८५ मध्ये झाली होती, जेव्हा झोऊ एक ट्रेनी टूर गाइड होते. ५ वर्षे पत्रांद्वारे संवाद साधल्यानंतर दोघांनी शेवटी लग्न केले. तिबेट ट्रिपदरम्यान भयंकर बर्फवृष्टीत अडकले असताना झोऊ यांनी आपल्या पत्नीला पाठीवर घेऊन गुहेपर्यंत नेले होते, जिथे त्यांनी तीन दिवस काढले. यिन जी मानतात की अशा जीवनसाथीसोबत आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर होतो. आज लग्नाच्या ३५ वर्षांनंतरही हे जोडपे आपल्या या सुंदर बागेत पाळीव कुत्रे आणि मांजरींसोबत राहते. जोडप्याला मुले नाहीत. दोघेही प्रत्येक वाढदिवस आणि वर्धापनदिनानिमित्त एकमेकांना हाताने लिहिलेली पत्रे देतात. चीनच्या केंद्रीय दूरचित्रवाणी (CCTV) वर दाखवल्यानंतर हे जोडपे देशभर ‘ड्रीम कपल’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us