DMart मधून वस्तू खरेदी करताय? या गोष्टी माहिती असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठं नुकसान
DMart मधून वस्तू खरेदी करत असाल, तर वस्तू बदलणे आणि परत करण्याचे नियम जाणून घेतले पाहिजे. या माहितीने तुमचं नुकसान होणार नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यात डीमार्ट पाहायला मिळत आहे. या डीमार्टमध्ये वस्तूंवरील चांगल्या ऑफरमुळे ग्राहकांची नेहमी रेलचेल असते. खाद्यपदार्थ असो या कपडे किंवा अन्य वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड पाहायला मिळते. डीमार्टमधून वस्तू खरेदी करणयावर सूट मिळते. परंतू एखादी खरेदी वस्तू परत द्यायची असल्यास काय नियम असतात, त्याविषयी अनेकांना माहिती नसते.
डीमार्टमधून कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर बिल लगेच फेकून देऊ नका. वस्तूमध्ये त्रुटी आढळली, तर ती वस्तू तुम्ही कोणत्या तारीख, किती रुपयांना खरेदी केली, याची माहिती असते. एखादी वस्तू पुन्हा देणे किंवा बदलण्यासाठी बिलाची गरज भासते. त्यासाठी बिलाचा फोटो काढणे फायदेशीर ठरू शकते. डीमार्टमधून एखादी वस्तू खरेदी करताना तपासून घेणे फायद्याचे ठरते. तुम्ही कपडे खरेदी करत असाल, कपड्याचा साईज, बटन इत्यादी तपासले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे व्यवस्थित आहे का, हे डीमार्टमध्येच तपासून घेतले पाहिजे. खाद्यपदार्थांची पॅकिंग आणि एक्सपायरी डेट तपासून घेतली पाहिजे.
एखाद्या वस्तूमध्ये त्रुटी आढळल्यास काउंटरवर बदलण्याची मुभा असते. प्रत्येक ग्राहकाला खराब वस्तू बदलून घेण्याचा अधिकार असतो. परंतु तुम्हाला डीमार्टच्या नियमांचं पालन करावं लागतं. खराब वस्तूच्या बदल्यात तुम्ही पैसे देखील पुन्हा मागू शकता. प्रत्येक वस्तूनुसार त्याचे परत करण्याचे नियम बदलताच. ग्राहकाला याविषयी काउंटवर व्यवस्थित माहिती मिळते. वस्तूमध्ये त्रुटी आढळून आल्यास तुम्हाला मूळ बिल, खरेदी केलेली वस्तू, पॅकिंग, प्राइज टॅग, वॉरंटी कार्ड आणणे आवश्यक आहे. खराब निघालेली इलेक्रॉनिक्स वस्तूही बदलून घेऊ शकता. तुमच्या जवळ बिल नसल्यास वस्तू बदलून घेणे किंवा परत करणे अवघड जाते. बिल हरवल्यास तुमच्याजवळ खरेदीची तारीख, वस्तूची संपूर्ण माहिती, पेमेंटची डिटेल असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही ग्राहक सेवा किंवा रिटर्न काउंटवर संपर्क साधू शकता. तुम्ही युपीआय किंवा कार्डद्वारे पेमेंटचा तपशील दाखवू शकता. परंतु बिल नसल्यास काउंटवर खराब वस्तू बदलून मिळण्याची गॅरंटी देता येत नाही.