VIDEO : अशी आगळीवेगळी ‘डॉग रेस’ पाहिली काय?; श्वानांच्या रोमांचक खेळाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा माकड, मांजर, कुत्रा यासारख्या प्राण्यांचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

VIDEO : अशी आगळीवेगळी ‘डॉग रेस’ पाहिली काय?; श्वानांच्या रोमांचक खेळाचा व्हिडीओ व्हायरल
डाॅग रेस
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 11:07 AM

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा माकड, मांजर, कुत्रा यासारख्या प्राण्यांचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, नुकताच सोशल मीडियावर डॉग रेसचा एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Dog race video goes viral on social media)

आपण सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत बघितले असतील पण तुम्ही डॉग रेस कधीच बघितली नसेल. या व्हिडीओमध्ये कुत्रे धावताना पाहून तुम्हाला वाटेल की कुत्र्यांची ऑलिम्पिक स्पर्धाच सुरू आहे की, का?  सोशल मीडियावर कुत्र्यांच्या अनोख्या शर्यतीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हे पाहिले जाऊ शकते की कुत्र्यांच्या दोन संघांमध्ये शर्यत चालू आहे.

प्रचंड वेगाने धावणाऱ्या कुत्र्यांचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. 12 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की रेस दरम्यान, कुत्रे एकमेकांशी टक्कर न घेता अगदी लहान जागेत धावत आहेत. हा व्हिडिओ @buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओमध्ये कुत्र्यांची शर्यत पाहून सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 86 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. यूजर्स हा व्हिडीओ फक्त शेअरच करत नाहीये, तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया देखील देत आहेत. बहुतेक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी अशाप्रकारची डॉग रेस पहिल्यांदाच बघितली आहे.

संबंधित बातम्या : 

Video | दुधाच्या बॉटल्स दिसताच हत्तीच्या पिल्लांना झाला आनंद, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

‘प्रँक’से करेंगे सबका स्वागत, दोन तरुणांचा भलताच प्रँक, Video पाहा, हसून लोटपोट व्हाल!

(Dog race video goes viral on social media)