दिल जीत लिया! परदेशातली पोरं भारतीय गाण्यावर कशी थिरकतायत? पाहा Viral video

Foreign boys dance on indian song : परदेशातही बॉलिवूड (Bollywood) गाण्यांचे फॅन फॉलोइंग आहे. एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही परदेशी मुले दिल लुटिया या गाण्यावर डान्स करत आहेत.

दिल जीत लिया! परदेशातली पोरं भारतीय गाण्यावर कशी थिरकतायत? पाहा Viral video
दिल लुटिया गाण्यावर डान्स करताना परदेशी मुलं
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 2:30 PM

Foreign boys dance on indian song : ज्याप्रमाणे भारतात परदेशी गाण्यांचे फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत, त्याचप्रमाणे परदेशातही बॉलिवूड (Bollywood) गाण्यांचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये असे व्हिडिओदेखील समाविष्ट केले जातात, ज्यामध्ये परदेशी लोकदेखील बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचताना दिसतात. ‘जीने मेरा दिल लुटिया’ हे पंजाबी गाणे तुम्ही ऐकले असेलच. आपल्या लोकांना हे गाणे खूप आवडते आणि त्यासोबतच परदेशातही लोकांना हे गाणे आता खूप आवडायला लागले आहे. आजकाल एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही परदेशी मुले या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या नृत्याने आणि अनोख्या शैलीने भारतीयांची मने जिंकली आहेत.

नाचण्याची अनोखी शैली

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बॅकग्राउंडमध्ये ‘दिल लुटिया’ गाणे वाजत आहे आणि काही परदेशी मुले त्यावर नाचत आहेत. त्यांची जुगलबंदी आणि डान्स स्टेप्स अप्रतिम आहेत. कधी तो रॅपरसारखे नाचताना दिसत आहेत, तर कधी मायकल जॅक्सनच्या स्टाइलमध्ये नाचत असल्याचे दिसत आहे. गाणे भारतीय आहे, तर त्यांची नाचण्याची शैलीही अनोखी आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा जबरदस्त व्हिडिओ bts_kimtaehyung_x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक त्यांच्या जबरदस्त डान्सचे कौतुक केले आहे.

जसविंदर सिंग बैंसने गायले आहे गाणे

‘जीने मेरा दिल लुटिया’ हे गाणे जसविंदर सिंग बैंस उर्फ जॅझी बी यांनी गायले आहे, जो एक भारतीय पंजाबी भांगडा गायक आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की त्यांना ‘क्राऊन प्रिन्स ऑफ भांगडा’ ही पदवीदेखील देण्यात आली आहे. त्यांची गाणी लोकांना खूप आवडतात.

आणखी वाचा :

Viral : ‘हे’ अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video

अशी काही लाथ मारली, की पुन्हा बैलाच्या नादी लागायचा नाही ‘हा’ बैल! Video viral

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral