Amazing stunt : आजकाल लोकांच्या डोक्यावर स्टंटचे भूत इतके बसले आहे, की विविध आणि धोकादायक स्टंट्स करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर (Social media) स्टंटशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये अनेक लोक चालत्या बाइकवर स्टंट करताना दिसतात, तर अनेकजण सायकल चालवून आपले कौशल्य दाखवतात. ‘मौत का कुआं’मध्ये लोक ज्या पद्धतीने स्टंट करतात, त्याचप्रमाणे आता लोक रस्त्यावरही स्टंट करताना दिसतात. अनेकांना स्टंटबाजीची एवढी हौस असते, की उंच आणि धोकादायक टेकड्यांवर उभे राहूनही ते असे स्टंट करतात, की ते पाहून हसू येईल. तर काही लोक परफेक्ट स्टंट करतात. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हत्तीवर (Elephant) चढून अप्रतिम स्टंट करताना दिसत आहे.
तुम्ही अनेकांना बॅकफ्लिप्स करताना पाहिले असेल, पण हत्तीवर कुणाला बॅकफ्लिप करताना पाहिले आहे का? नक्कीच पाहिले नसेल, पण असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक महाकाय हत्ती समोर थोडासा झुकलेला आहे आणि एक माणूस धावत येतो आणि त्याच्यावर उडी मारून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये हत्तीनेही त्याला खूप साथ दिली आणि त्या व्यक्तीने हवेत 2-3 बॅकफ्लिप मारले आणि त्यानंतर हत्तीच्या अंगावर आला. त्याचे संतुलन आश्चर्यकारक आहे. तो बॅकफ्लिप इतक्या अचूकपणे मारतो की तो थेट हत्तीवर उतरतो.
View this post on Instagram
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर elephant.lover.lover या आयडीसह हा आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 7 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.