याला म्हणतात डोकॅलिटी… ना मॅरेज ब्यूरोत जायची गरज, ना सोशल मीडियावरील ओळखीची… महिलेने शोधला भन्नाट फॉर्म, आयडिया ऐकूनच…

आजच्या धावपळीच्या जीवनात डेटिंग ॲप्सवर जोडीदार शोधून वैतागलेल्या एका अमेरिकन महिलेने नवा मार्ग शोधला. एरिन पॅटरसनने डेटिंग ॲप्स ऐवजी थेट ‘पतीसाठी अर्ज फॉर्म’ (गुगल फॉर्म) तयार केला.

याला म्हणतात डोकॅलिटी... ना मॅरेज ब्यूरोत जायची गरज, ना सोशल मीडियावरील ओळखीची... महिलेने शोधला भन्नाट फॉर्म, आयडिया ऐकूनच...
| Updated on: Oct 01, 2026 | 4:25 PM

आजच्या बिझी आयुष्यात प्रेम, जोडीदार शोधण्याचे मार्ग एकदम बदलले आहे. डेटिंग ॲप्सवर सतत स्वाईप करायलाही लोकं कंटाळले आहेत. यामचमुळे बोअर झालेल्या एका अमेरिकेन महिलेने नवा मार्ग शोधून काढला. मॅट्रिमोनी साइट्स किंवा डेटिंग ॲपवर माहिती भरण्याऐवजी तिने थेट एक गुगल फॉर्म तयार केला. तिची ही पद्ध्त खूप चर्चेत आली असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय देखील झाली आहे.

डेटिंग ॲप्सला वैतागून शोधला नवा पर्याय

Loading...

nypost मधील एका रिपोर्टनुसार, नॉर्थ कॅरोलिनाच्या शार्लोटमध्ये राहणारी 36 वर्षांची एरिन पॅटरसन (Erin Patterson) सध्या खूप चर्चेत आहे. डेटिंग ॲप्सवर खूप वेळ वाया जातो हे पाहून आणि तिथे सीरियस लोकं न मिळाल्याने वैतागलेल्या एरिनने चक्क ‘पतीसाठी अर्ज फॉर्म’ तयार केला तिने हा फॉर्म आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पिन करून ठेवला. विशेष म्हणजे त्यानंतर 240 पेक्षा जास्त लोकं हा फॉर्म भरण्यात इंटरेस्टेड होते.

करिअर ते कुटुंब.. विचारले अनेक प्रश्न

एरिनच्या फॉर्ममध्ये इंटरव्ह्यूप्रमाणे, थेट आणि स्पष्ट प्रश्न विचारण्यात आले. “ मला असा देखणा, समजूतदार, दयाळू आणि मनमिळावू मुलगा भेटावा, ज्याला कॉफी किंवा डिनर डेटवर छान गप्पा मारायला आवडतील” असं तिने गुगल फॉर्ममध्ये लिहिलं. या लांबलचक फॉर्ममध्ये करिअर, दैनंदिन सवयी आणि नातेसंबंधांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. उदाहरणार्थ, तुमच्या करिअरची उद्दिष्टं काय आहेत? तुमची दिवसभराची दिनचर्या आणि फिटनेस रूटीन कसं आहे? तसेच लग्न आणि कुटुंबाबाबत तुमचे विचार काय आहेत? असे काही प्रश्न त्यात नमूद होते.

 

सोशल मीडियावर जबरदस्त रिस्पॉन्स

एरिनची ही अनोखी पद्धत इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाली. यावर मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली; मात्र बहुतेक लोकांनी तिचं कौतुक केलं. “ ही खरोखरच धाडसी आणि नवीन कल्पना आहे. आम्हाला याचा निकाल नक्की कळवा.” असं एकाने लिहीलं. “इतक्या प्रामाणिक मुली क्वचितच पाहायला मिळतात, ज्या व्यक्तीला त्या मिळतील, तो खरोखरच नशीबवान असेल.” असं आणखी एकाने लिहीलं. अनेक मुलींनी तर आपणही पार्टनर शोधण्यासाठी अशीच पद्धत अवलंबणार असल्याचंही जाहीर केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us