खतरनाक…, गौतमीचा नाद करायचा नाही, त्या स्टेपने वेधलं लक्ष, चाहते फिदा, Video व्हायरल

‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर गौतमी पाटीलचा ठसकेबाज डान्स. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओने वेधलं सर्वांचं लक्ष. होतोय कमेंट्सचा वर्षाव.

खतरनाक..., गौतमीचा नाद करायचा नाही, त्या स्टेपने वेधलं लक्ष, चाहते फिदा, Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 12:43 PM

Gautami Patil : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जुनी गाणी नव्याने चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला होता. त्यानंतर अशातच आता तिचा आणखी एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर केलेल्या डान्सची जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या खास ठसक्याच्या आणि ऊर्जा भरलेल्या स्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने यावेळीही प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.

निळा ब्लाऊज आणि पांढरी साडी

या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलने निळ्या रंगाचा ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून स्टेजवर धडाकेबाज डान्स केला आहे. साध्या पण आकर्षक लुकमध्ये तिने केलेल्या डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. साडीमध्येही तिचा आत्मविश्वास आणि मंचावरील डान्स पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

‘पाटलांचा बैलगाडा’ या दमदार गाण्यावर गौतमीने सादर केलेल्या स्टेप्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. तिच्या खास एक्सप्रेशन्स, डोळ्यांतील खट्याळपणा आणि गाण्याच्या तालावर अचूक बसणारी बॉडी लँग्वेज यामुळे चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकांनी कमेंटमध्ये गौतमीसारखा डान्स दुसरा कोणी करू शकत नाही, तिच्या स्टेप्सची नक्कल करणे अशक्य आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर या डान्सला एनर्जीचा स्फोट असेही म्हटले आहे.

लाखो व्ह्यूज

गौतमी पाटीलच्या या डान्स व्हिडीओने काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत असून, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही या प्रतिसादावरून दिसून येते आहे.

गेल्या काही वर्षांत गौतमी पाटीलने आपल्या खास डान्स स्टाइलमुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक मराठी गाण्यांना आधुनिक टच देत ती सादर करत असलेल्या परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यावरचा तिचा हा डान्स सर्वत्र चर्चेत असून पुढे ती कोणत्या नव्या गाण्यावर थिरकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us