Gudhi padwa recipe : तोंडाला पाणी सुटणारी ‘ही’ थाळी करून पाहाच, Video viral

Tasty food video : गुढीपाडवा (Gudhi padwa) म्हणजे आपले नववर्ष. आता असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. आम्रखंड, कुरमा पुरी, मसाल्याचा भात यासह विविध चविष्ट असे खाद्यपदार्थ असलेला हा व्हिडिओ आहे.

Gudhi padwa recipe : तोंडाला पाणी सुटणारी ही थाळी करून पाहाच, Video viral
गुढीपाडव्यानिमित्त व्हायरल झाली पारंपरिक चविष्ट रेसिपी
Image Credit source: Youtube
| Updated on: Apr 01, 2022 | 7:30 AM

Tasty food video : गुढीपाडवा (Gudhi padwa) म्हणजे आपले नववर्ष. आपण मानत असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाची सुरुवात, नवे संकल्प तसेच सुवर्ण खरेदी आदी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचीही सुरुवात होते. या दिवसाच्या निमित्ताने आपण विविध संकल्प करतो. विविध खाद्यपदार्थ करत असतो. यावरचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल (Viral) झाला आहे. आम्रखंड, कुरमा पुरी, मसाल्याचा भात यासह विविध चविष्ट असे खाद्यपदार्थ आपण करत असतो. हे पदार्थ कोणाला आवडणार नाहीत, असा शोधूनही सापडणार नाही.

चविष्ट आम्रखंड पुरीचा बेत

आम्रखंड पुरीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही थाळी तयार करण्याची पद्धत, पूर्वतयारी आदल्या दिवशी कशी तयारी करायची याची प्रक्रिया सांगितली आहे. चक्का तयार करण्याची पद्धतही त्यात सांगितली आहे. साखर, आंबा, दुधावरची साय मिक्सरमधून एकत्र करून ते चक्क्यामध्ये एकजीव कसे करून घ्यायचे, हेही सांगितले आहे. त्यानंतर कैरीची डाळ आणि त्याची रेसिपी सांगितली आहे. कुरमा भाजी, पुरी याचीही प्रक्रिया पूर्ण समजावून सांगितली आहे.

यूट्यूबवर अपलोड

हा व्हिडिओ सरिताज् किचेन (Sarita’s Kitchen) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. गुढीपाडव्यानिमित्त बनवलेली विशेष रेसिपी यामुळे यूझर्स हा व्हिडिओ पसंत करत आहेत. ‘गुढीपाडवा स्पेशल थाळी | योग्य नियोजन करून आम्रखंड, कुरमा पुरी, मसाले भात, कोथिंबीर वडी रेसिपी’ अशी कॅप्शन देत 30 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. एका दिवसातच 187k व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.

आणखी वाचा :

दिल जीत लिया! परदेशातली पोरं भारतीय गाण्यावर कशी थिरकतायत? पाहा Viral video

Viral : ‘हे’ अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral