हॉटेलमधील रोमान्स पडू शकतो महागात, रुममध्ये जाताच या तीन गोष्टी आधी तपासा, अनेकजण करतात दुर्लक्ष

तुम्ही देखील हॉटेलमध्ये आपल्या जोडीदारासोबत राहण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी या 3 गोष्टी रुममध्ये जाताच तपासा. अन्यथा....

| Updated on: Jan 19, 2026 | 3:42 PM
1 / 6
सध्या बाहेर फिरायला जायचं म्हटलं की अनेक कपल हॉटेलमध्ये थांबणं पसंत करतात. हॉटेल रूम म्हणजे थोडा निवांतपणा, खासगीपणा आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी असते.

2 / 6
यामध्ये काही कपल हॉटेलमध्ये खासगी क्षणांचा आनंद घेतात हे स्वाभाविकच आहे. मात्र, अशा वेळी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

3 / 6
सर्वात प्रथम हॉटेल रूममध्ये प्रवेश करताच लाईट बंद करा आणि पडदे ओढून घ्या. त्यानंतर मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू करा. अनेक छुपे कॅमेरे अंधारात इन्फ्रारेड लाइट वापरतात. ही लाइट मानवी डोळ्यांना दिसत नाही, मात्र मोबाईल कॅमेऱ्यावर लाल किंवा जांभळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात दिसू शकते.

4 / 6
तसेच टीव्ही किंवा एसीचा रिमोट समोर धरून त्याचे बटण दाबून पाहा. रिमोटमधील इन्फ्रारेड लाइट कॅमेऱ्यावर दिसत असल्यास, आजूबाजूला अशाच प्रकारचे संशयास्पद ठिपके दिसतात का, याची खात्री करा.

5 / 6
मोबाईलचा टॉर्च किंवा फ्लॅशलाइट ऑन करून संपूर्ण रूममध्ये हळूहळू फिरा. कॅमेऱ्याच्या लेन्सवर टॉर्चचा प्रकाश पडल्यास निळसर किंवा जांभळट चमक दिसते. काचेसारखी चमकणारी एखादी जागा दिसल्यास ती तपासणे गरजेचे आहे.

6 / 6
आजकाल बहुतेक छुपे कॅमेरे वाय-फायशी कनेक्ट असतात. यासाठी ‘Fing’ सारखी अ‍ॅप्स डाउनलोड करून नेटवर्कला जोडलेली डिव्हाइसेस तपासता येतात. तसेच हॉटेलच्या वाय-फाय नेटवर्कवर कोणकोणती उपकरणे जोडलेली आहेत याची खात्री करून घ्या.