कमालच झाली, AI कॅमेऱ्याने गिटारला समजले पाठचा प्रवासी, विना हेल्मेटची पावती कापून पत्नीला पाठवली नोटीस…

सौविक दत्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक पोस्ट टाकली आहे. ही घटना 15 सप्टेंबर, 2026 रोजी घडली आहे. त्यांच्या पत्नीला विनाहेल्मेट प्रवासाची पाचशे रुपयांची दंडाची नोटीस पाठवली आहे.

कमालच झाली, AI कॅमेऱ्याने गिटारला समजले पाठचा प्रवासी, विना हेल्मेटची पावती कापून पत्नीला पाठवली नोटीस...
Notice for not wearing a helmet due to guitar
| Updated on: Sep 28, 2026 | 10:01 PM

एकीकडे एआयने किचकट काम सोपे होत आहे. परंतू एआयवर संपूर्णपणे विसंबून राहाणे किती धोकादायक आहे.याचे एक मासलेवाईक उदाहरण बंगळुरु येथे घडले आहे. येथे एआय कॅमेऱ्याचा अजब कारनामा उघडकीस आला आहे. येथे एक व्यक्ती त्याच्या मोटार सायकलीवरुन पाठी गिटार लावून चालला होता. एआय कॅमेऱ्यांना वाटले पाठी सहप्रवासी विना हॅल्मेट बसला आहे. मग एआय कॅमेऱ्याने थेट ५०० रुपयांची पावती कापून या व्यक्तीच्या पत्नीला पाठवले.

ही व्यक्ती त्याच्या पत्नीच्या मालकीच्या दुचाकीवर एकट्याने प्रवास करत होता. केवळ त्याने पाठी मागे गिटार घेतले होते.  तरीही त्याची ऑनलाईन ५०० रुपयांची पावती कापली गेली. जेव्हा त्याच्या पत्नीला दंडाचा मेल आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. कथितपणे एआय कॅमेऱ्यांनी त्याच्या पाठीला लावलेल्या गिटारला विना हेल्मेटचा प्रवासी समजल्याने हा घोटाळा झाला.

Loading...

सौविक दत्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्टमध्ये कॅमेऱ्याने खेचलेला फोटो शेअर केला आहे. ज्यात ते हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवत पाठी गिटार टांगून जाताना दिसत आहे. ही घटना १५ सप्टेंबर २०२६ ची आहे.त्यानंतर त्यांची पत्नीच्या नावे ५०० रुपयांचे चलन जारी झाले. ज्यात पाठी बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्याचे कारण दिले होते.

पत्नीची दुचाकी चालवत होते दत्ता

दत्ता यांनी बंगलुरु वाहतूक पोलिसांना टॅग तरत एआय आधारित वाहतूक उल्लघंन ओळख प्रणालीतील कथित त्रूटीकडे लक्ष वेधले आहे आणि दंड भरण्याचा आदेश दिला आहे. दत्ताने यांनी २६ सप्टेंबर रोजी एक्सवर एक पोस्ट लिहीत म्हटले की बंगसुरुत मी माझ्या पत्नीची दुचाकी एकटा चालवत होतो आणि पाठी गिटार टांगलेले होते.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

दत्ता यांनी पुढे सांगितले की त्यांची पत्नीला पाठी बसलेल्या सह प्रवाशाने हेल्मेट घातले नव्हते यासाठी वाहतूक पावती (नोटिस क्रमांक 86202541) जारी केली गेली. त्यांनी एआय आधारित वाहतूक उल्लघंन ओळख प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत दंड रद्द करण्याची विनंती केली आहे. बंगलुरु वाहतूक पोलिसांनी त्यांची पोस्टला उत्तर देथ त्यांना या चुकीत सुधार करण्यसाठी ई-मेल करणे किंवा संबंधित नंबरावर संपर्क करण्यास सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us