असं एक ठिकाण जिथे महिला तासाभरासाठी घेतात नवरे भाड्याने, पुढे काय होतं?
लातवियामध्ये महिला घरगुती कामांसाठी आणि देखभालसाठी 'तासाभराचे पती' भाड्याने घेतात. या देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असल्याने मोठा लिंग असमानता आहे. यामुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कामासाठी पुरुष मिळणे कठीण होते. प्लंबिंग, दुरुस्ती यासारख्या कामांसाठी ही अनोखी प्रथा उदयास आली आहे,

नवरे भाड्याने घेतले जाऊ शकतात, असा कधी विचार तुमच्या मनात आला का? पण ते खरं आहे. जगातील असा एक देश आहे, जिथे महिला तासाभरासाठी नवरे भाड्याने घेतात. युरोपातील लातविया या देशात नवरे भाड्याने घेण्याची सर्रास परंपरा आहे. त्यामुळे हा देश नेहमीच चर्चेत असतो. या देशातील महिला नवऱ्यांना भाड्याने घेतात. त्यांना घरी बोलावतात. त्यांना घरातील छोट्यामोठ्या कामांपासून मेंटेनेन्सची कामे सांभाळायला लावतात.
लातविया या देशात पुरुषांची कमी आहे. त्यामुळे येथील महिला घरगुती कामासाठी “हस्बंड फॉर अॅन ऑवर” म्हणजे तात्पुरते हेल्पर ठेवत आहेत. ही हेल्परवाली स्कीम काय आहे? त्यावर टाकलेला हा प्रकाश…
भाड्यानेच का?
लातवियामध्ये पुरुषांची संख्या एवढी कमी झाली आहे की महिलांना घरातील कामे उरकण्यासाठी तासाभरासाठी नवरे भाड्याने घ्यावे लागत आहेत. या देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 15 टक्के अधिक आहे. त्यामुळे जेंडर बॅलन्स बिघडला आहे. त्यामुळेच घर कामासाठी पुरुषांची गरज भासत आहे. पण पुरुष घरकामासाठी मिळत नसल्याने तासाभरासाठी नवरे भाड्याने घेण्याची संकल्पना पुढे आली आहे.
चिंतेंचं कारण काय?
अनेक देशात तरुणांच्या तुलनेत वृद्धांचं प्रमाण अधिक आहे. ही स्थिती सामान्य मानली जाते. कारण त्यात जेंडर असमतोलाची समस्या कमी असते. पण वर्ल्ड अॅटलासच्या एका रिपोर्टनुसार, लातवियामध्ये 65 वर्षावरील अधिक वयाच्या लोकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या दुप्पट आहे. हा गंभीर जेंडर इम्बॅलन्स झाल्याने महिलांना योग्य जीवनसाथी मिळणं कठिण झालं आहे. त्यामुळे लग्न करण्याचं आव्हान या महिलांसमोर उभं ठाकलं आहे.
परिणाम काय?
लातवियातील महिलांच्या म्हणण्यानुसार, लैंगिक असमानतेमुळे दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी पुरुषांची कमतरता स्पष्टपणे जाणवते. एका महिलेने सांगितले की, तिच्या ऑफिसमध्ये सर्व सहकारी महिलाच आहेत. वातावरण चांगले असले तरी पुरुष असते तर काम आणखी रोचक झाले असते. याच कमतरतेमुळे अनेक महिला योग्य जोडीदाराच्या शोधात परदेशात जातात, जेणेकरून त्यांना संतुलित आणि परिपूर्ण जीवनसाथी मिळू शकेल.
या अॅप्सचा वापर
या देशातील महिलांना वाटते की पुरुषांची कमतरता त्यांना सर्वत्र जाणवते. मग ती रोजची घरगुती कामे असोत किंवा भावनिक आधाराची गरज, प्रत्येक परिस्थितीत पुरुषांची अनुपस्थिती खटकते. त्यामुळेच इथे Komaanda 24 सारखे प्लॅटफॉर्म “Men with Golden Hands” या नावाने सेवा पुरवतात, ज्यात प्लंबिंग, सुतारकाम, दुरुस्ती किंवा टीव्ही इन्स्टॉलेशन यांसारख्या कामांसाठी पुरुषांना बोलावले जाते. याशिवाय Remontdarbi.lv नावाच्या वेबसाइटवर महिला फोनवर बोलण्यासाठी किंवा घरकामासाठी “तासाभराचे पती” भाड्याने घेतात, जे रंगकाम, घरगुती दुरुस्ती आणि देखभाल यांसारखी कामे सांभाळतात.