Viral Video | मस्ती करणं भोवलं, झोपाळ्यावर बसल्यानंतर माकडाची चांगलीच फजिती, मजेदार व्हिडीओ पाहिलात का ?
एका माकडासोबत वेगळाच प्रकार घडला आहे. हे माकड एका लोखंडी झोपाळ्यावर बसून झोका घेत आहे. मात्र आपला तोल सांभाळू न शकल्यामुळे माकडाला तोच लोखंडी झोपाळा जोरात लागला आहे. जोराचा मार बसल्यामुळे हे माकड विव्हळत असल्याचे दिसतेय. पुढे तर माकडाने हात त्याच्या तोंडावर नेत ओरडणे सुरु केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हसत आहेत.

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय चर्चेत येईल हे सांगता येत नाही. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकरी आवडीने पाहतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये मस्ती करणाऱ्या माकडाची चांगलीच खोड मोडली असून हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरुन हसत आहेत.
लोखंडी झुल्यावर बसून झोका खेळण्याचा प्रयत्न
असं म्हणतात की माकड हा अतिशय चंचल प्राणी आहे. माकड एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारण्यात तरबेज असते. तसेच काही माकड माणसांची नक्कल देखील करतात. सध्या मात्र एका माकडासोबत वेगळाच प्रकार घडला आहे. हे माकड एका लोखंडी झोपाळ्यावर बसून झोका घेत आहे. मात्र आपला तोल सांभाळू न शकल्यामुळे माकडाला तोच लोखंडी झोपाळा जोरात लागला आहे. जोराचा मार बसल्यामुळे हे माकड विव्हळत असल्याचे दिसतेय. पुढे तर माकडाने हात त्याच्या तोंडावर नेत ओरडणे सुरु केले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हसत आहेत.
पाहा व्हिडीओ :
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो इन्स्टाग्रामवर prince996013 या अकाऊंटवर पाहता येईल. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला दहा लाख लोकांनी लाईक केले आहे. तसेच काही लोकांनी या व्हिडीओलो उत्स्फूर्तपणे शेअरदेखील केले आहे. जास्त मस्ती करणे शरीरीसाठी हानीकारक असते अशी मजेदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.
इतर बातम्या :
Video : ‘टिप-टिप बरसा पाणी’वर थिरकले धनश्री आणि युझवेंद्र चहल, काश्मीरमधील व्हिडिओ व्हायरल
Video : जेव्हा जंगलात दोन वाघ एकमेकांशी भिडतात…भांडण आणि दोस्तीचा अनोखा किस्सा
Video : लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ