इथे महिला येतात ब्रा टांगून जातात… काय आहे या ‘ब्रा’च्या भिंतीचं अतरंगी रहस्य? Video व्हायरल
न्यूझीलंडमधील कार्डोना येथील 'ब्रा भिंत' जगभरात प्रसिद्ध आहे. २००० साली सुरु झालेली ही अजब प्रथा सुरुवातीला वादग्रस्त ठरली, पण आता ती ब्रेस्ट कॅन्सर जागृती आणि निधीसाठी समर्पित आहे. हजारो महिला इथे ब्रा टांगून जातात, ज्यामुळे या भिंतीला एक अनोखा अर्थ मिळाला आहे. या अतरंगी परंपरेमागे एक रंजक इतिहास दडलेला आहे.

इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेदार आणि रंजक आहे. या व्हिडीओत चक्क ब्राची भिंत दिसत आहे. एका कुंपणावर हजारो ब्रा लटकलेल्या दिसत आहेत. या कुंपणाला ब्राची भिंत म्हणून ओळखलं जात आहे. त्यामुळे खरंच अशी भिंत आहे की केवळ व्हायरल होण्यासाठी असा व्हिडीओ बनवलाय, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, एवढं मात्र नक्की.
हा व्हिडीओ न्यूझीलंडमधील असल्याचा दावा केला जात आहे. न्यूझीलंडमध्ये एक असं कुंपण आहे की जिथे ब्रा टांगल्या जातात. या ठिकाणी येणारी प्रत्येक महिला या कुंपणावर ब्रा टांगून जाते, असं सांगितलं जातं. या व्हायरल व्हिडीओचा जेव्हा मागोवा घेण्यात आला तेव्हा असंख्य रोचक किस्से समोर आले आहेत.
ज्या ठिकाणी ही ब्राची भिंत उभी आहे, त्या जागेचं नाव कार्डोना आहे. पण या ब्राच्या भिंतीमुळे या परिसराला कार्डोना ऐवजी ब्राड्रोना म्हटलं जातंय. 2000 मध्ये या ब्राच्या भिंतीची सुरुवात झाली. याबाबतची एक मजेदार गोष्ट सांगितल्या जातेय. चार महिला कार्डोना हॉटेलात 2000 सालाचं स्वागत करत होत्या. उशिरा रात्री पबमधून बाहेर पडल्यावर त्यांनी शतकातील नव्या वर्षाचं स्वागत म्हणून आपल्या ब्रा काढून समोरच्या कुंपणावर टांगल्या. नवीन वर्षाच्या आणि शतकातील पहिल्या सकाळीच कुंपणावर अंडरगार्मेंट्स टांगलेल्या पाहून लोक आश्चर्यचकित झाले. लोकांना नवीन वर्षाचं स्वागत करण्याची ही हटके पद्धत प्रचंड आवडली. त्यानंतर पुढच्या वर्षी कुंपणावर शेकडो महिलांनी आपल्या ब्रा लटकवल्या. मग कधीही महिला या ठिकाणी ब्रा टांगून जायला लागल्या. त्यानंतर बघता बघता संपूर्ण कुंपणच ब्राने झाकोळून गेलं. एका भिंती सारखं ते दिसू लागलं.
ब्रा जाळल्या, कोर्टात आव्हान
दरम्यान, अशा प्रकारे ब्रा टांगून त्याची भिंत बनवण्याचा प्रकार काही स्थानिक लोकांना आवडला नाही. तर काही लोक ही जल्लोष करण्याची अतरंगी पद्धत म्हणून ब्राची भिंत तशीच ठेवण्याची भलामण करू लागले. काही लोकांनी वाहतुकीसाठी अडथळा असल्याचं सांगत ही भिंत हटवण्याचा प्रयत्न केला. कारण ही भिंत मुळी हायवेला लागून होती. काहींनी या ब्रा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं. पण हे कुंपण सार्वजनिक ठिकाणीच असल्याचं स्पष्ट झालं.
त्यानंतर शेवटी क्वीन्सटाऊन लेक्स डिस्ट्रिक्ट कौन्सिलने यात हस्तक्षेप केला आणि या ब्रा हटवण्याचे आदेश देण्यात आले. कारण ही भिंत दिसायला अश्लाघ्य आणि वाहतुकीला धोकादायक होती. 2006मध्ये या भिंतीवरून 1500 हून अधिक ब्रा हटवण्यात आल्या. त्यामुळे ब्रासाठीची लढाई संपली असं वाटत होतं, पण तसं झालं नाही.
अन् ट्विस्ट आला
अजून रचनात्मकता बाकी होती. आधी ब्रा हायवेच्या किनारी एका कुंपणावर टांगल्या जात होत्या. त्यामुळे वाहतुकीचा हवाला देऊन त्या हटवण्याची मागणई झाली. त्यानंतर या ब्रा द कार्ड्रोना नावाची घोडेस्वारी आणि क्वाड बायकिंग व्यवसाय क्षेत्राच्या मेनगेटवर लावण्यात आल्या. 2015मध्ये त्याचं नाव ब्रॅड्रोना ठेवण्यात आलं. ब्रेस्ट कॅन्सरसाठी फंड गोळा करण्याकरिता या ठिकाणी एक दानपेटीही ठेवण्यात आली. आता इथे येणारी प्रत्येक महिला ब्रा दान करत असते. इथल्या भिंतीवर ब्रा लटकवतात. अनेक वर्षापासून या भिंतीवर ब्रा टांगल्या जात असल्याने या ठिकाणी शेकडो ब्रा आहेत. आता ही भिंत ब्रेस्ट कॅन्सरने पीडित महिलांसाठी समर्पित आहे.