Viral Video : महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असते; अचानक म्हातारी व्यक्ती समोर येते, अन्…

ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांना कधीकधी विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका महिला रिपोर्टर(Lady Reporter)शी संबंधित आहे. या व्हिडीओ(Video)मध्ये एका वृद्ध व्यक्ती(Old man)चे विचित्र वागणे पाहून महिला रिपोर्टरला धक्का बसला आहे. ती संतापते.

Viral Video : महिला रिपोर्टर रिपोर्टिंग करत असते; अचानक म्हातारी व्यक्ती समोर येते, अन्...
लाइव्ह रिपोर्टिंग करताना महिला पत्रकार
| Updated on: Feb 02, 2022 | 5:51 PM

Reporting Video : तुम्ही सोशल मीडियावर ग्राउंड रिपोर्टिंगचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ज्यामध्ये एक रिपोर्टर काही मुद्द्यावर लोकांना प्रश्न करताना दिसतात. अनेकदा ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांना अशा काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या वृत्तांकनात अडथळा निर्माण होतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका महिला रिपोर्टर(Lady Reporter)शी संबंधित आहे. या व्हिडीओ(Video)मध्ये एका वृद्ध व्यक्ती(Old man)चे विचित्र वागणे पाहून महिला रिपोर्टरला धक्का बसला आहे. यानंतर ती त्या व्यक्तीवर रागावताना दिसत आहे. त्याच वेळी, जवळ उभे असलेले लोकदेखील वृद्ध व्यक्तीचे कृत्य पाहून आश्चर्यचकित झाले. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून हसायला येते आणि आश्चर्यही वाटते.

गर्दीतून बाहेर येतो म्हातारा

एक महिला रिपोर्टर ग्राउंड रिपोर्टिंगसाठी कुठेतरी गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान ती लोकांशी काही विषयावर बोलण्याच्या तयारीत होती. यादरम्यान, ती कॅमेरा चालू करण्यासाठी तिच्या कॅमेरामनशी बोलते आणि रिपोर्टिंगचे वातावरण तयार करू लागते. तेवढ्यात अचानक एक म्हातारा गर्दीतून बाहेर येतो आणि त्याच्याकडे बघू लागतो.

इन्स्टाग्रामवर अपलोड

म्हातारा माणूस ज्या प्रकारे महिला रिपोर्टरकडे टक लावून पाहतो, त्यामुळे महिला रिपोर्टरचे लक्ष त्या वृद्ध व्यक्तीकडे वार्तांकन करण्यापासून वळते. म्हातारा असा टक लावून बघत राहिल्याने महिला रिपोर्टरला अत्यंत अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागते. यानंतर, महिला रिपोर्टर वृद्ध व्यक्तीला सुनावते. महिला रिपोर्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक वृद्ध व्यक्तीवर राग काढत आहेत. memewalanews या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

Biker Stunt Video Viral : हुक्की आली म्हणून स्टंटबाजी केली अन् असाकाही आपटला, की…

तंत्रज्ञानाचा ‘असा’ही आविष्कार, लंडनमधली Wheelchair Lift पाहिली का? Video होतोय Viral

कितने तेजस्वी लोग हैं! Escalatorवर उलटं पळणारे हे तरूण पाहा, प्रवाहाविरूद्ध चालणं यालाच म्हणतात!