कधीकाळी मित्रांपासून लपवून करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक,कहाणी व्हायरल

नऊ वर्षांपूर्वी, कौशिक खारवी यांनी आयुष्यातील एका कठीण काळात स्विगीमध्ये पार्ट-टाइम डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम सुरू केले. आज मागे वळून पाहताना ते म्हणतात की , डिलिव्हरीचे काम आपल्या मित्रांपासून लपून करायचे..

कधीकाळी मित्रांपासून लपवून करायचा फूड डिलिव्हरी, आज आहे प्रसिद्ध Seafood Joint चा मालक,कहाणी व्हायरल
Seafood Joint owner post his story
| Updated on: Sep 28, 2026 | 10:47 PM

बंगळुरुत एका व्यक्तीने आपली कहानी सोशल मीडियावर शेअर केली आहे. गुगल फोटोवर त्याला त्याचे काही जुने फोटे दिसले, ज्यात स्विगी डिलिव्हरी पार्टनरच्या आयकार्डच्या फोटोचाही समावेश होता. ज्यामुळे त्याच्या जुन्या आठवणी जागा झाल्या. त्यानंतर कौशिक खारवी यांनी स्विगी आयकार्डचा फोटो शेअर केला आणि सांगितले की तेही बंगळुरुच्या काही चांगल्या सीफूड्स रेस्टॉरंटच्या पिकअप काऊंटवर वाट पाहायचे आणि फूड डिलिव्हरी करायचे. आज ते एका सीफूड रेस्टॉरंटचे मालक आहेत.परंतू एकेकाळी ते आपल्या मित्रांपासून त्यांचे फूड डिलिव्हरीचे काम लपवून करायचे.

वास्तविक नऊ वर्षांपूर्वी कौशिक खारवी यांनी त्यांच्या जीवनात एका अडचणीच्या काळात स्विंगी सोबत पार्ट टाईम डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. पाठी वळून बघितल्यानंतर त्यांनी सांगितले की डिलिव्हरीचे काम करताना ते मित्रांपासून लपून हा जॉब करायचे. त्यांना भीती वाटायची की ते त्यांना एक डिलिव्हरी करणाऱ्या समजून वाळीत टाकतील. ही कहानी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Loading...

कहानी आठवून भावूक झाला

जेव्हा Google Photos ने जुन्या आठवणींना ताजे केले, तेव्हा कौशिक याने Instagram त्या दिवसातील काही फोटो शेअर केले, ज्यात त्यांचे Swiggy ID कार्डचा देखील समावेश होता. त्यांना आठवले की कसे ते बंगलुरुतील हायफाय सीफूड रेस्टॉरंटच्या पिकअर काऊंटरवर डिलिव्हरीसाठी वाट पाहायचे.

परंतू आज, कौशिक त्याच रेस्टॉरंटच्या काऊंटरच्या दुसऱ्या बाजूला आहेत.त्यांनी शहरात ‘Mangalore in Bangalore’ नावाचे प्रसिद्ध सीफूड जॉईंट सुरु केले आहे.त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, टॉप सीफूड रेस्टॉरंटच्या पिकअपवर वाट पाहाण्यापासून ते बंगुलुरु शहरात प्रसिद्ध सीफूड रेस्टॉरंट मँगलोरची स्थापना करण्याचा हा प्रवास !

कौशिक यांनी लिहिलंय की ग्राहक, पार्टनर आणि टीमच्या सहयोगाशिवाय त्यांची ही प्रगती शक्य नव्हती. याहून चांगल्याची कल्पना करु शकत नव्हतो. आणि हे सर्व आमचे ग्राहक, पार्टनर आणि संपूर्ण टीमच्या जबरदस्त सहकार्यामुले झाले आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.’ त्यांनी स्विगीचे देखील आभार मानले, की त्यांनी अशा काळात सहकार्य केले.ज्याला त्यांनी आपले ‘मुश्कील दिन’ म्हटले आहे.

गरीबी ते अमिरीची कहानी

त्यांची जुन्या फोटोंची पोस्ट व्हायरल झाली आहे. कारण सोशल मीडिया युजर्सने कौशिक यांच्या सुरुवातीचा संघर्ष आणि आज त्यांची स्थिती यातील अंतराचे कौतूक केले आहे. त्यांच्या प्रवासाला गरीबी ते श्रीमंतीपर्यंत कहानी म्हटले आहे. एका युजरने योग्य म्हटले आहे की त्यांची खरी संपत्ती ते अनुभव, संघर्ण आणि शेवटी मिळालेला विजय आहे. जो त्यांना या प्रवासात मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us