
रस्त्यावर वाहन चालवताना वाहनांच्या मागील बाजूस लिहिलेले संदेश आपण सर्वांनी पाहिले आहेत. बहुतेक संदेश सोपे असतात, तर काही लोक असे असतात जे आपल्या गाड्यांच्या मागे काही शायरी लिहितात. गाडीच्या मागे जाताना असे मेसेज तुम्ही अनेकदा पाहिले असतील. असे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण एका मेसेजने लोकांना डोकं खाजवायला भाग पाडलं आहे. सहज वाचता येईल असा हा साधा संदेश नाही. ते डिकोड करताना तुम्हाला प्रचंड डोकं लावावं लागेल.
सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काही हिंदी शब्द, काही इंग्रजी आणि काही गणित एकत्र मिसळून हा संदेश लिहिला गेलाय. सध्या प्रथमदर्शनी वाचून प्रत्येकाला समजणे शक्य होत नाही. संदेश समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. मात्र, काही जण तासन् तास या चित्राकडे पाहत राहिले तरी कुणालाही समजण्यासाठी प्रचंड डोकं लावावं लागणारे. अवघ्या १० सेकंदात हे उत्तर शोधून सांगणारी व्यक्ती स्वत:ला हुशार समजू शकते.
गाडीच्या मागील बाजूस ‘प 2 1/2 G1 KA 1/2र है’ असे लिहिले होते, जे लोकांना काय लिहिले आहे ते समजत नाही. जर तुम्हाला अजून उत्तर सापडले नसेल तर ते वाचण्यासाठी एक छोटीशी युक्ती अवलंबा. सर्वप्रथम हिंदीत मोठ्याने बोलावं लागेल. बोलता बोलता हिंदीत वाचण्याचा प्रयत्न केला तर त्यावर सहज तोडगा निघेल. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यानंतर बहुतांश लोक गोंधळून गेले आहेत. ‘प 2 1/2 G1 KA 1/2र है’ याचं उत्तर आहे, ‘पढाई जीवन का आधार है।”