AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंगच्या प्रायवेट पार्टला स्पर्श…; ‘धुरंधर’मधील लुल्ली डकैतने सांगितला शुटिंगचा अनुभव

सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता चित्रपटाच्या सुरुवातीली हमजाला म्हणजेच रणवीर सिंगच्या प्रायवेट पार्टला स्पर्श करुन शोषण करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ज्या अभिनेत्याने लुल्ली डकैतची भूमिका साकारली आहे त्याने सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे.

रणवीर सिंगच्या प्रायवेट पार्टला स्पर्श...; 'धुरंधर'मधील लुल्ली डकैतने सांगितला शुटिंगचा अनुभव
Dhurandhar Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 30, 2025 | 5:23 PM
Share

रणवीर सिंगचा स्पाय-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर २६ दिवस उलटले असले तरी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात एकापेक्षा एक सरस किरदार आहेत, पण ‘लुल्ली डकैत’चे किरदार सर्वात वेगळे ठरले. ‘धुरंधर’मध्ये लुल्ली डकैतची भूमिका नसीम मुगलने साकारली आहे. तो चित्रपटाच्या सुरुवातीला रणवीर सिंगच्या पात्राचे शोषण करताना दिसतो आणि त्याच्या प्रायव्हेट पार्लाट स्पर्श करतो. आता नसीमने त्या सीनबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, सुरुवातीला त्यांनी हा सीन करण्यास नकार दिला होता.

फिल्मीज्ञानला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत नसीम मुगल यांनी ‘धुरंधर’मधील आपल्या भूमिकेबद्दल अनेक खुलासे केले. रणवीर सिंगसोबतच्या व्हायरल सीनबाबत ते म्हणाले, ‘त्या सीनबद्दल मी काय सांगू… त्या सीनचा तो क्षण खरंच धक्कादायक होता. जेव्हा पहिल्यांदा मला त्या सीनबद्दल सांगितले गेले, तेव्हा मला वाटले की मी हे करु शकणार नाही. मी खरंच नकार दिला होता.’

‘सीन अनेक वेळा वाचल्यावर मी खूप घाबरलो होतो’

नसीम मुगल पुढे म्हणाला की, सुरुवातीला तो सीन वाचून तो घाबरला होता. पण नंतर रणवीर सिंगने त्याला समजावले. नसीम म्हणाला, ‘हे माझ्यासाठी शक्य होणार नाही, कारण तो सीन अनेक वेळा वाचल्यावर मी खूप घाबरलो होतो. सत्य हे आहे की मी रणवीर सरांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांची एनर्जी, विशेषतः पद्मावतनंतरची, नेहमीच अद्भुत राहिली आहे. माझ्या मनात कुठेतरी हाच विचार येत राहिला की ते इतके मोठे स्टार आहेत, मी त्यांच्यासमोर हा सीन कसा करू शकेन? रणवीर सरांनी मला बोलावले आणि माझ्याशी बोलले.’

व्हायरल सीन फक्त दोन टेकमध्ये शूट झाला

अभिनेत्याने खुलासा केला की, रणवीर सिंगसोबतचा त्याचा व्हायरल सीन फक्त दोन टेकमध्ये शूट झाला होता. तो म्हणाला, ‘पहिल्या टेकमध्ये, जे किरदार कामुक आणि क्रूर असायला हवे होते, ते काहीसे जास्तच क्रूर झाले होते. म्हणून दुसऱ्या टेकमध्ये आम्ही ते थोडे कमी केले.’

13 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता नसीम मुगल

नसीम म्हणाला, ‘येथे माझ्या कामासाठी जे प्रेम आणि प्रशंसा मिळत आहे, ते सर्व ‘धुरंधर’ टीममुळेच आहे. मी बराच काळ असाच एखादा क्षण शोधत होतो. गेल्या १३ वर्षांपासून मी आयुष्यातील या क्षणाची वाट पाहत होतो. अखेर हा क्षण कधी येईल.’

ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.