Video : फक्त 5 कपडे धुण्याचा खर्च 12,000 रुपये? ‘त्या’ हॉटेलच्या लॉन्ड्री दरांवरून सोशल मीडियावर चर्चा

हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर साहजिकचं आपणं हॉटेलच्या लाँड्रिचा वापर करतो. हजार दोन हजार इतकं बिल येणं साहजिकच असतं. पण या विदेशी तरूणाला इतकं बिल आलंय की त्याचे डोळेचं विस्फारले आहेत.

Video : फक्त 5 कपडे धुण्याचा खर्च 12,000 रुपये? त्या हॉटेलच्या लॉन्ड्री  दरांवरून सोशल मीडियावर चर्चा
viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 17, 2026 | 4:34 PM

हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर साहजिकचं आपणं हॉटेलच्या लाँड्रिचा वापर करतो. हजार दोन हजार इतकं बिल येणं साहजिकच असतं. पण या विदेशी तरूणाला इतकं बिल आलंय की त्याचे डोळेचं विस्फारले आहेत. कारण त्यानं हॉटेलमध्ये केवळ 5 कपडे धुण्यासाी आणि इस्त्री करण्यासाठी दिले होते. पण त्याच्या हातात हजारोंच्या घरात बिल आलं आहे.

सोशल मीडियावर सध्या या विदेशी व्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा पर्यटक पाकिस्तानातील एका हॉटेलमध्ये राहत होता. त्यावेळी त्याने हॉटेलच्या लॉन्ड्रीत फोन करून आपले पाच कपडे धुण्यासाठी आणि इस्त्री करण्यासाठी दिले. नेहमीप्रमाणे 500 – 1000 पर्यंत बील येईल असा त्याचा अंदाज होता. मात्र काही वेळाने हॉटेलचा कर्मचारी जेव्हा त्याचे कपडे घेऊन खोलीत आला.तेव्हा त्यानं दिलेलं बील पाहून पर्यटकाला मोठा धक्का बसला.

Loading...

 

पाच कपड्यांसाठी 12 हजारांचा खर्च

हॉटेल कर्मचाऱ्यांन या पर्यटकाच्या हातात 12 हजार पाकीस्तानी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं बिल ठेवलं.ही रक्कम साधारण 40 अमेरिकन डॉलर इतकी होती. केवळ 5 कपड्यांसाठी एवढे पैसे कसे काय आकारले, असा प्रश्न त्यानं कर्मचाऱ्याला विचारला. त्यावर कर्मचाऱ्यानं अगदी सहजपणे हा सामान्य दर असल्याचं सांगितलं.

इतकंच नाही, तर ही हाय क्लास सेवा नसून साधी सेवा असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. जर पर्यटकानं हाय क्लास सेवा घेतली असती.तर यापेक्षाही जास्त बिल त्याला भरावे लागले असते. असं उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले. हे उत्तर ऐकून कर्मचारी चक्रावून गेला. वाद न घालता त्याने रक्कम तर भरली पण घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कमेंट्सचा भडिमार झाला. काहींनी 5 कपड्यासांठी इतकं बिल आकारल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. तर काहींनी विदेशी पर्यटक असल्याने त्याकडून जास्त पैसे घेतले असावेत अशी शक्यता व्यक्त केली. तर काहींनी या ठरवलेल्या किंमतीवरून हॉटेलच्या मालकाची खिल्ली उडवली. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी हॉटेलचं नाव आणि त्याच्या लाँन्ड्री सेवांचे अधिकृत दर याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पर्यटकाची फसवणूक झाली की हॉटेलचे दरच जास्त होते. हे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us