रॅकूनचा तरूणीपेक्षा भारी डान्स, सोशल मीडियावर लाखोंनी हिट्स

उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा एक प्राणी म्हणजे रॅकून. क्यूट असणारा हा प्राणी सोशल मीडिया अगदी धूमाकुळ घालत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रॅकून मुलीची कॉपी करताना दिसत आहे.

रॅकूनचा तरूणीपेक्षा भारी डान्स, सोशल मीडियावर लाखोंनी हिट्स
rakoon
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 4:20 PM

मुंबई: उत्तर अमेरिकेत आढळणारा लांब शेपटीचा एक प्राणी म्हणजे रॅकून. क्यूट असणारा हा प्राणी सोशल मीडिया अगदी धूमाकुळ घालत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रॅकून मुलीची कॉपी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सर्वांनाच हा व्हिडिओ खूप आवडत आहे. सोशल मीडिया यूजर्सना व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करायला सुरुवात केली आहे.

इथे पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे मुलगी नाचत आहे तिच्या सोबत रॅकूनसुद्धा डान्स करताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये गाणे वाजते आणी मुलगी नाचू लागते तीच्या सोबत रॅकून तिची कॉपी करायला लागते. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हसणारे इमोजी आणि मजेदार कमेंट्स शेअर करत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत 166.6k व्ह्यूज मिळाले आहेत.रॅकूनचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यावर लोक अनेक कमेंटही देत ​​आहेत. एका युजरने यावर कमेंट केली आहे की – या व्हिडिओमध्ये रॅकून खूप गोंडस दिसत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या युजरने लिहले आहे की ‘हे रॅकून खूप खोडकर दिसत आहे’

इतर बातम्या :

फेसबुक लाईव्ह जीवावर बेतलं, रेल्वेखाली येऊन चेंदामेंदा, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

हॉटेलमधला धक्कदायक प्रकार, थुंकी लावून भाजत होता रोटी, पोलिसांनी आचाऱ्याला दाखवला इंगा

सोन्याचे बिस्कीट वितळवून तयार केली चक्क 1 किलोची चेन, पाहा व्हायरल व्हिडीओ