हॉटेलमधला धक्कदायक प्रकार, थुंकी लावून भाजत होता रोटी, पोलिसांनी आचाऱ्याला दाखवला इंगा

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या एका हॉटेलमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. येथे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये तेथील आचारी थुंकी लावून तंदूर रोटी भाजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हॉटेलमधला धक्कदायक प्रकार, थुंकी लावून भाजत होता रोटी, पोलिसांनी आचाऱ्याला दाखवला इंगा
cook2

मुंबई : दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या एका हॉटेलमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. येथे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये तेथील आचारी थुंकी लावून तंदूर रोटी भाजतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदू रक्षा दलाच्या तक्रारीनंतर, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तमीजुद्दीन असे आरोपीचे नाव असून, तो बिहारच्या किशनगंजचा रहिवासी आहे. पोलीसांनी आरोपी तमिझुद्दीनला अटक केली असून हा चिकन पॉईंट बंद केला आहे.

संपूर्ण प्रकरण गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाण्याच्या राकेश मार्गावर असलेल्या चिकन पॉईंटवर हा सर्व प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ दोन दिवस जुना असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस कारवाई करुन, तमिझुद्दीनला अटक केली आहे . त्याला सध्या तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

हा 59 सेकेंदाचा व्हिडिओ त्यांना शनिवारी सायंकाळी मिळाला. यानंतर पोलीस तबडतोब संबंधित ढाब्यावर पोहोचले. हा व्हिडिओ दाखवून त्यांनी असे करण्यामागचे कारण विचारले. यावर आरोपीने त्यांच्यासोबत आरेरावी केली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली

यापूर्वी बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे पहिले प्रकरण नाही. याआधीही असे अनेक व्हिडिओ पश्चिम उत्तर प्रदेशातून व्हायरल झाले आहेत, ज्यावर प्रचंड गोंधळ उडाला आहे. यापूर्वीही समोर आलेल्या अशा व्हिडिओंमध्ये अटक करण्यात आली होती.

 

इतर बातम्या :

सोन्याचे बिस्कीट वितळवून तयार केली चक्क 1 किलोची चेन, पाहा व्हायरल व्हिडीओ

मालकाला बघून आनंदला ‘हंस’, हातात हात घालून केली सफर, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक

‘पप्पू कांट डांस’ म्हणत नव्या नवरीचा भन्नाट व्हिडीओ, तुम्हालाही हसू आवरणार नाही

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI