मुंबई : आज शिवजयंती (shiv jayanti 2023) राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात मागच्या तीन वर्षात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी उपक्रम राबविण्यात आले नव्हते. परंतु या वर्षी संपुर्ण राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या जिल्ह्यात गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांनी (maharashtra police) वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पुणे (pune shivjayanti) जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणांची गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात सुध्दा आज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कालपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. तो लोकांच्या अधिक पसंतीला सुध्दा पडला आहे.
सह्याद्रीच्या कड्या कपारीत घोंगवणाऱ्या बेभान वाऱ्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
कपाळावर लावल्या जाणाऱ्या केशरी टीळ्यात अन् चंद्रकोरीत महाराजांचं अस्तित्व आहे.
फॅशन म्हणून का असेना पण तरुणांनी वाढविलेल्या दाढी मिशित महाराजांचं अस्तित्व आहे.
गाड्यांवर लावल्या जाणाऱ्या रेडियम स्टिकर मध्ये महाराजांचं अस्तित्व आहे.
फोन मध्ये आवर्जून ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक भगव्या वॉलपेपर मध्ये महाराजांचं अस्तित्व आहे.
आपल्या पूर्वजांनी जिला रक्ताने शिंपिले त्या या काळया मातीच्या कणाकणात महाराजांचं अस्तित्व आहे.
घरावर, गाड्यांवर, रस्त्यावर, अन् चौका चौकात डौलाने फडकत असणाऱ्या भगव्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
गडकिल्ले सर करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकांच्या स्नायूंच्या बळात महाराजांचं अस्तित्व आहे.
पोवाड्या दरम्यान डफावर पडणाऱ्या प्रत्येक थापित अन् तुणतुण्या च्या तारेत महाराजांचं अस्तित्व आहे.
मराठा इतिहासाच्या पुस्तकातल्या शब्दा शब्दांत महाराजांचं अस्तित्व आहे.
भवानी मातेच्या प्रांगणात घुमनाऱ्या ‘आई राजा उदो उदो’ या जयघोषात महाराजांचं अस्तित्व आहे.
गिरिदुर्गा च्या एका एका दगडात, खाचित अन् खीळग्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
ज्यांच्या पायावर डोके ठेवून लाखो सागरलहरी माघारी जातात त्या प्रत्येक जलदुर्गात महाराजांचं अस्तित्व आहे.
गडावरील भुयारात, माचीवर, पागेत, टेहळणी बुरूज ते पाण्याच्या टाक्यात झिरपत येणाऱ्या एका एका थेंबात महाराजांचं अस्तित्व आहे.
स्वराज्याच्या दुष्मनांच्या छातीत आज पण भरते त्या धडकित महाराजांचं अस्तित्व आहे.
हर हर महादेव म्हणत असताना अंगावर येणाऱ्या प्रत्येक शहाऱ्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
‘शिवाजी महाराज की’ म्हणताच, आपसूकच ओठी येणाऱ्या ‘जय’ मध्ये महाराजांचं अस्तित्व आहे.
इतिहासाच्या सोनेरी पानांत दरवळणारया रक्तचंदनात महाराजांचं अस्तित्व आहे.
अजून टिकून राहिलेल्या प्रत्येक फेट्यात, शालुत, टोपित, धोतरात, ते डोक्यावर घेतलेल्या प्रत्येक पदरात महाराजांचं अस्तित्व आहे.
ब्राम्हणांच्या ज्ञानात, क्षत्रियांच्या शौर्यात, व्यापार्याच्या धनात, अन् शुद्रांच्या भूमीत महाराजांचं अस्तित्व आहे.
जयंतीला डीजे वर वाजणाऱ्या प्रत्येक गाण्याच्या ठेक्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
मंदिराच्या शिखरापासून ते गर्भगृहापर्यंत प्रत्येक खाचीत अन् साच्यात महाराजांचं अस्तित्व आहे.
इमान इतबारे आपलं काम करणाऱ्या प्रत्येक कष्टकरी मनगटात महाराजांचं अस्तित्व आहे.
देव्हाऱ्यावर अखंड अविरत मिणमिणत राहणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात महाराजांचं अस्तित्व आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या प्रत्येक गुंठ्यांत अन् त्यातल्या प्रत्येक ढेकळात महाराजांचं अस्तित्व आहे.
आपलं नाव, आडनाव, धर्म, आणि आस्तित्वातच महाराजांचं अस्तित्व आहे.
प्रत्येक हिंदूच्या अंगातील रगीत अन् छातीतल्या धगीत महाराजांचं अस्तित्व आहे.
ज्याने इतिहास वाचला आणि जाणला त्या प्रत्येकाच्या शरीरात सळसळणाऱ्या रक्ताच्या कत्र्या कत्र्यात महाराजांचं अस्तित्व आहे…