Video : ऐसी धाकड है… लग्नाच्या वेळी नवरीचा व्यायाम, वधूच्या पुशअप्सची सोशल मीडियावर चर्चा

Viral Video : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नववधू पुश-अप्स करताना दिसत आहे. नवरीचा हा व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Video : ऐसी धाकड है... लग्नाच्या वेळी नवरीचा व्यायाम, वधूच्या पुशअप्सची सोशल मीडियावर चर्चा
नवरीचा व्हीडिओ व्हायरल
| Updated on: Apr 15, 2022 | 4:37 PM

मुंबई : लग्नात वेगवगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नववधू पुश-अप्स करताना दिसत आहे. नवरीचा हा व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हीडिओमध्ये या वधूने एक वजनदार वधूचा लेहेंगा घातला आहे. याशिवाय तिने भरपूर दागिने घातलेले दिसतात. नववधू अचानक दोन्ही हात जमिनीवर ठेवून पुश-अप मारण्यास सुरुवात करते. पुश-अप्स मारल्यानंतर ती उभी राहून तिचा बॉडी फिटनेस दाखवते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लेहेंगा आणि दागिने घातलेली नववधू पुश-अप्स करताना दिसत आहे. नवरीचा हा व्हीडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हीडिओमध्ये या वधूने एक वजनदार वधूचा लेहेंगा घातला आहे. याशिवाय तिने भरपूर दागिने घातलेले दिसतात. नववधू अचानक दोन्ही हात जमिनीवर ठेवून पुश-अप मारण्यास सुरुवात करते. पुश-अप्स मारल्यानंतर ती उभी राहून तिचा बॉडी फिटनेस दाखवते. तिचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ दिनेश अकालू या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘फिटनेसची वेगळी लेव्हल! लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये पुश-अप करताना वधू”, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल… एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘सासऱ्यांसाठी हा एक प्रकारचा इशारा आहे.’ तर दुसरा म्हणतो, “फिट अॅण्ड फाईल नवरी.”

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…