Video | पती रस्त्यात मुलीसोबत नाचत होता, बायकोने पकडून-पकडून मारलं, व्हिडीओ पाहून…

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक पुरुष एका महिलेसोबत डान्स करीत आहे. हे सगळं पत्नीनं पाहिल्यानंतर काय झालं ते व्हिडीओ पाहा.

Video | पती रस्त्यात मुलीसोबत नाचत होता, बायकोने पकडून-पकडून मारलं, व्हिडीओ पाहून...
VIRAL VIDEO (
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 30, 2023 | 2:26 PM

मुंबई : सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये तुमचं मनोरंजन होणार आहे, एवढं मात्र नक्की. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना हसू आवरत नाहीये. काही लोकांनी हा व्हिडीओ (VIRAL VIDEO) पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हि़डीओ नेटकऱ्यांसाठी मस्करीचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओने आतापर्यंत अनेकांचं मनोरंजन केले आहे. त्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी (USERS)चांगल्या वाईट कमेंट सुध्दा केल्या आहेत.

पत्नी आणि पत्नी यांच्यात नेहमी क्षुल्लक कारणावरुन भांडणं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक वेगळाचं प्रकार पाहायला मिळाला आहे. पत्नीला रस्त्यात पतीला मारहाण करीत बाहेर नेलं आहे. हा व्हिडीओ प्रत्येकासाठी मनोरंजनाचा एक भाग झाला आहे.

मुलीसोबत करीत होता डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्यात एका ग्रुपमध्ये डान्स करीत आहे. मुलीसोबत महिलेचा पती सुद्धा डान्स करीत आहे. मुलीने स्कर्ट आणि शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यावेळी हा प्रकार पत्नीला पाहायला मिळतो. त्यावेळी संतापलेली पत्नी सगळ्या माणसांच्या देखत पतीला मारहाण करण्यास सुरुवात करते. तिथं पाहत असलेली सगळी लोकं पती-पत्नीचा तमाशा बघण्यात मग्न होतात. पतीने घरी गेल्यानंतर सुध्दा अधिक मार खाल्ला असेल असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लोकांना हा व्हिडीओ आवडला

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना स्वत:च्या खात्यावर शेअर केला आहे. त्याचबरोबर इतरांना सुध्दा हा व्हिडीओ लोकं पाठवत आहेत. हा व्हिडीओ 2 लाख 59 हजार लोकांनी आतापर्यंत वाचला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ लगातार कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ती व्यक्ती जिवंत आहे का ? तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, त्याच्या पत्नीला आपल्या पतीला राजा सोलोमन बनताना पाहायचे नाही. आणखी एका यूजरने लिहिले की, आता त्याच्यासाठी जगणे खूप कठीण आहे.