Video | तब्बल 13 फुटांचा अजस्र साप, उचलण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 21, 2021 | 8:19 PM

सध्या तर चकित करणारा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एका तेरा फूट लांबीच्या सापाला उचलण्यासाठी चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे.

Video | तब्बल 13 फुटांचा अजस्र साप, उचलण्यासाठी घ्यावी लागली जेसीबीची मदत, व्हिडीओ व्हायरल
SNAKE VIRAL VIDEO
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखाद्या माणसाची करामत चर्चेचा विषय ठरते. तर कधी प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या तर चकित करणारा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एका तेरा फूट लांबीच्या सापाला उचलण्यासाठी चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागल्याचं दाखवण्यात आलंय. या सापाला जेसीबीच्या मदतीने हलविण्यात आले आहे. या सापाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

तब्बल 13 फुटांचा साप, जेसीबीच्या मदतीने वर उचलले

मिळालेल्या माहितीनुसार कॅरेबियन डोमिनिका बेटावरील (Caribbean island of Dominica) जंगलात हा तेरा फूट लांबीचा साप आढळला आहे. या सापाचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा साप अतिशय मोठा असल्यामुळे त्याला जागेवरुन हटवण्यासाठी चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली. जेसीबीच्या मतदीने सापाला वर उचलले जात असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या सापाला जंगलात पकडण्यात आले आहे. टिकटॉकवर अपलोड केल्यानंतर त्याला काही क्षणात तब्बल 79 मीलियन वेळा पाहण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा साप अतिशय लांब आणि मोठा असल्यामुळे त्याला जेसीबीच्या मदतीने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. हा व्हिडीओ सध्या यूट्यूबवर पाहता येईल.

इतर बातम्या :

एनसीबीचे अधिकारी ‘मन्नत’वर धडकले, नेटकऱ्यांचा शाहरुखला पाठिंबा, #ShahRukhKhan, #Mannat ट्रेंडिंगवर

VIDEO : डोळ्यांवर पट्टी, हातात तलवार, या महिलांची तलवारबाजी पाहून भलेभले

VIDEO : लग्नात नाचता नाचता पडले नवरा-नवरी, व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरेना

(thirteen feet snake found in jungle picked up with the help of crane video went viral on social media)