इस्त्राईलमध्ये जखमी सैनिकांना बरं करण्यासाठी सेक्स थेरपीचा वापर, उपचाराचा सर्व खर्च सरकारकडून

इस्त्राईलमध्ये जखमी सैनिकांना बरं करण्यासाठी थेट सेक्स थेरपीचा वापर केला जातो (Use of sex therapy to cure injured soldiers in Israel).

इस्त्राईलमध्ये जखमी सैनिकांना बरं करण्यासाठी सेक्स थेरपीचा वापर, उपचाराचा सर्व खर्च सरकारकडून
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 10:11 PM

जेरुसलेम (इस्त्राईल) : युद्धात लढताना किंवा सीमेवर संरक्षण करताना एखादी चमकमक घडली तर अनेक सैनिक जखमी होण्याच्या घटना घडतात. सैनिका हा देशासाठी प्राण पणाला लावतो. त्यामुळे जखमी सैनिकावर योग्य उपचार करणं हे सरकारचं कर्तव्य असतं. प्रत्येक देशांमध्ये त्या त्या देशाचं सरकार आपल्या सैनिकांसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवते. इस्त्राईलमध्येही सैनिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. इस्त्राईलमध्ये तर जखमी सैनिकांना बरं करण्यासाठी थेट सेक्स थेरपीचा वापर केला जातो. या थेरपीवर अनेकजण आक्षेप घेत असले तरी इस्त्राईलमध्ये जखमी सैनिकाला बरं करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे इस्त्राईल सरकार या सर्व उपचारासाठी खर्च करते (Use of sex therapy to cure injured soldiers in Israel).

सेक्स थेरपी म्हणजे नेमकं काय?

अनेक देशांमध्ये रोगींना ठिक करण्यासाठी सेक्स थेरपीचा वापर केला जातो. यामध्ये एका व्यक्तीला रोगीचा सेक्स पार्टनर म्हणून ठेवलं जातं. ही उपचाराची एक वादग्रस्त पद्धत असल्याने या पद्धतीचा फार कमी वापर केला जातो. मात्र, इस्त्राईल देशात या थेरपीचा वापर करुन सैनिकांना बरं केलं जातं. याबाबत ‘बीबीसी’ने वृत्त दिलं आहे. जे सैनिक खूप जखमी झाले आहेत अशा सैनिकांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो (Use of sex therapy to cure injured soldiers in Israel).

सेक्स थेरपीचं इस्त्राईलमध्ये मोठं केंद्र

इस्त्राईलमध्ये सेक्स थेरपिस्ट रोनित अलोनी यांचं मोठं क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये रोगीला समजवण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय पेड सेरोगेंट्स रुग्णाला शारीरीक संबंध कसे बनवायचे किंवा सेक्स कसं करायचं याबाबत माहिती देतात. हे क्लिनिक कोणत्याही हॉटेल सारखं वाटत नाही. मात्र, या क्लिनिकमध्ये असलेल्या रुममध्ये बेड, एक सीडी प्लेयर, शॉवर याची व्यवस्था असते. तसेच भींतींना आकर्षकपणे सजवण्यात आलं असतं जेणेकरुन रुग्णामध्ये कामुक भावना निर्माण व्हावी.

थेरपीद्वारे उपचार घेणाऱ्या सैनिकाचं नाव गुपित

इस्त्राईलमध्ये या थेरपीची निंदा केली जाते. मात्र, तरीही या थेरपीसाठी इस्त्राईल सरकार रुग्णाचा संपूर्ण खर्च उठवतं. एखाद्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णासाठी या पद्धतीनेही तिथे उपचार केला जातो. विशेष म्हणजे या थेरपीद्वारे उपाचर करण्यात येणाऱ्या सैनिकांचे नाव सार्वजनिक केले जात नाही.

तीस वर्षांपूर्वी सैन्यातील एका कर्मचाऱ्याला या थेरपीद्वारे उपचार करण्यात आला होता. मात्र, या कर्मचाऱ्याचं नाव सार्वजनिक करण्यात आलं नव्हतं. या व्यक्तीला मिस्टर A असं काल्पनिक नाव देण्यात आलं आहे. मिस्टर ए या व्यक्तीला उंच भागावरुन पडल्याने लकवा झाला होता. या सैनिकावर सेक्स सरोगेट थेरपीने उपचार करण्यात आले होते.

हेही वाचा : VIDEO : कुत्र्याला मास्क घालून खांद्यावर घेतलं, म्हणाला “मी स्वतः मरेल, पण ‘पुरु’ला मरु देणार नाही”

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.