डोळ्यासमोरच iPhone 18 Pro दरीत कोसळला… काळजाचा ठोकाच चुकला; तरुणी रडून रडून बेजार

केबल कारमध्ये iPhone 18 Pro अनबॉक्सिंग करत असताना तो मुलीच्या हातातून निसटून खोल दरीत पडला. हा धक्कादायक क्षण एका व्हायरल व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. लाखो रुपयांचा नवा फोन गमावल्याने मुलीला मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

डोळ्यासमोरच iPhone 18 Pro दरीत कोसळला... काळजाचा ठोकाच चुकला; तरुणी रडून रडून बेजार
लाखोंचा फोन कोसळला दरीत
| Updated on: Oct 14, 2026 | 6:11 PM

हवेत असलेल्या केबल कारमध्ये तुम्ही बसलायत, तुमच्या हातात जगातील सर्वात महागडा आणि लेटेस्ट फोन आहे… पण पुढल्याच क्षणी तो फोन तुमच्या हातातून निसटून तुमच्या डोळयांसमोरच शेकडो फूट खोल दरीत कोसळला तर ? मिनी हार्ट अटॅकच येईल ना.. पण असं खरोखर घडलंय.. हो, हो, अगदी खरं.. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. ज्याने ज्याने तो व्हिडीओ पाहिला , एकच वाक्य म्हटलं – देवा , हे काय झालं ?

हवेत असताना जोशात उघडला फोन बॉक्स, क्षणभराने जे घडलं…

Loading...

व्हायरल व्हिडिओमध्ये कझाकस्तानमधील एक फायनान्शियल व्लॉगर खुल्या केबल कारमधून प्रवास करताना दिसलीहे. उत्साहाच्या भरात ही तरुणी आपल्या मैत्रिणीसमोर नव्या कोऱ्या बरगंडी रंगाच्या iPhone 18 Pro चे अनबॉक्सिंग करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, फोन बॉक्समधून बाहेर काढून तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक तिच्या हातातून फोन निसटला. अत्यंत महागाचा असा तो आयफोन थेट डोंगराखाली असलेल्या खोल आणि दगडधोंड्यांनी भरलेल्या दरीत जाऊन पडला. क्षणभरापूर्वी आनंदात असलेलं वातावरण, तो फोन खाली पडताच अचानक टेन्स झालं आणि दुःखात बदललं.

सेकंदांत गायब झाला लाखोंचा फोन

फोन दरीत पडताच तरुणीला मोठा धक्का बसतो आणि ती ढसाढसा रडू लागली. तिच्यासोबत बसलेली मैत्रीणही हे दृश्य पाहून किंचाळली. विशेष म्हणजे, समोरून जाणाऱ्या दुसऱ्या केबल कारमध्ये बसलेली एक व्यक्तीही हा संपूर्ण प्रकार पाहून आश्चर्यचकित झाली.

इन्स्टाग्रामवरील @toleubekovna_kz_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नव्या फोनचा आनंद साजरा करत असतानाच काही क्षणांत तो कायमचा गमावल्याची ही घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

इथे पहा व्हिडीओ

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us