डी-मार्टमध्ये सर्वात जास्त मुलीच का कामाला असतात? कारण ऐकून तुम्ही….

सर्व सामान्य लोकांसाठी सर्वात स्वत आणि प्रत्येक गोष्टी एकाच ठिकाणी मिळणारे ठिकाण म्हणजे डी-मार्ट. पण डी-मार्टमध्ये सर्वात जास्त मुलीच का कामाला असतात? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 21, 2026 | 1:54 PM
1 / 5
राज्यातील तसेच देशभरातील डी-मार्टच्या अनेक स्टोअर्समध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेने जास्त दिसून येते. यामागे केवळ एक कारण नसून अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये रोजगार धोरण, ग्राहकसेवा, कामाचे स्वरूप आणि सामाजिक बदल अशी अनेक कारणे आहेत.

2 / 5
डी-मार्टसारख्या क्षेत्रात काउंटर ऑपरेटर, बिलिंग, ग्राहक मार्गदर्शन, शेल्फ व्यवस्थापन आणि स्टोअर देखभाल यांसारखी कामे मोठ्या प्रमाणावर असतात. ही कामे संयम, शिस्त आणि ग्राहकांशी व्यवस्थित संवाद करून ती करावी लागतात. या बाबतीत महिला कर्मचारी प्रभावीपणे जबाबदारी पार पाडतात असा अनुभव व्यवस्थापनाला आहे.

3 / 5
तसेच डी-मार्टमध्ये तुलनेने ठरावीक शिफ्ट्स, सुरक्षित कार्यस्थळ आणि स्थिर पगाराची सोय उपलब्ध असते. त्यामुळे घराजवळ नोकरी शोधणाऱ्या अनेक महिलांसाठी हे रोजगाराचे आकर्षक ठिकाण ठरते. तसेच घर आणि नोकरी यांचा समतोल साधणे महिलांना सोपे जाते.

4 / 5
डी-मार्टसारख्या कंपन्या महिलांना नोकरीच्या संधी देऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करतात. यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढतेच, शिवाय महिलांचा आत्मविश्वास आणि समाजातील सहभागही वाढतो.

5 / 5
डी-मार्टमध्ये महिलांची संख्या जास्त असण्यामागे व्यवस्थापनाचे धोरण, कामाचे स्वरूप, सुरक्षितता आणि महिलांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. त्यामुळे डी-मार्टमध्ये सर्वात जास्त कामगार या महिला असतात.