अप्रतिम स्टेप, छम्मक छल्लोवर महिलेचा डान्स, 100 वेळा पाहिलं तरी पुन्हा-पुन्हा Video बघत आहेत लोक

100 वेळा पाहिलं तरी लोक पुन्हा-पुन्हा बघत आहेत गुलाबी साडीमधील या महिलेचा डान्स व्हिडीओ. छम्मक छल्लो गाण्यावर अशा केल्या स्टेप की सर्वांनी केलं प्रचंड कौतुक.

अप्रतिम स्टेप, छम्मक छल्लोवर महिलेचा डान्स, 100 वेळा पाहिलं तरी पुन्हा-पुन्हा Video बघत आहेत लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 13, 2026 | 5:47 PM

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील, राधा पाटील, ऐश्वर्या जाधव यांंच्या डान्स व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच सध्या एका महिलेच्या भन्नाट डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसून या महिलेने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या ‘रा-वन’ चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ या लोकप्रिय गाण्यावर घरामध्ये ठेका धरला आहे. तिच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये घरातील हॉलमध्ये काही महिला पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. याच वेळी गुलाबी बनारसी सिल्क साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केलेली महिला पुढे येते. गाण्याची धून सुरू होताच ती आत्मविश्वासाने नृत्य करायला सुरुवात करते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, नृत्यातील सहजता आणि गाण्याच्या तालावर केलेल्या स्टेप्समुळे व्हिडीओ अधिक आकर्षक झाला आहे.

Loading...

विशेष म्हणजे, तिच्या नृत्याचा आनंद घेत मागे उभ्या असलेल्या महिलाही टाळ्या वाजवताना आणि हसून तिचं कौतुक करताना दिसतात. कोणताही संकोच न बाळगता तिने केलेल्या नृत्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या डान्स स्टेपचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं आहे.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेच्या डान्सचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्या नृत्याची तुलना करीना कपूरच्या नृत्यशैलीशी केली आहे. तिचा आत्मविश्वास, गुलाबी साडीतील लूक आणि गाण्याशी साधलेला ताल यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

पारंपरिक साडीतील आकर्षक लूक आणि उत्साहपूर्ण नृत्य यांमुळे हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक चाहते हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघत आहेत. सोशल मीडियावर देखील या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि अनेकांनी शेअर देखील केला आहे. सोशल मीडियावर अशा व्हिडीओंना मिळणारा प्रतिसाद पाहता, साध्या कौटुंबिक क्षणांचंही आपल्या खास अंदाजामुळे आकर्षक सादरीकरणात रूपांतर होऊ शकतं, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us